Life Styleसरकारी माहिती

तुमचे मोफत रेशन हे काम न केल्यास होणार बंद! शासन निर्णय

तुमचे मोफत रेशन हे काम न केल्यास होणार बंद! शासन निर्णय


वेगवान नाशिक/अतुल सूर्यवंशी

सटाणा : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार जाहीर आव्हान शिधापत्रिकाधारकाना करण्यात येत आहे की, आपल्या शिधापत्रिका मध्ये जे कोणी सदस्य मयत आहेत.

शेअर मार्केट दिवाळीत एवढ्या दिवस बंद Stock market

परंतु त्यांची नावे अजूनही शिधापत्रिकेतून वगळली नाहीत. अशा सदस्यांचे नाव कमी करून घेण्यासाठी शिधापत्रिका वाटप कार्यालयात आपण संपर्क साधायचा आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

मोठी बातमीःकांद्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

त्याकरिता मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला,आधार कार्ड आणि शिधापत्रिका या कागदपत्रांची आवश्यकता आहे.आपल्या जवळील पुरवठा विभागाच्या कार्यालयात जायचा आहे. तेथे जाऊन जी व्यक्ती मयत झालेली आहे. त्या व्यक्तीच्या नाव हे रेशन कार्ड मधून कमी करून घ्यायचा आहे.

100 रुपये लावून शेयर मार्केट मध्ये करा जोरदार कमाई

आपल्या कुटुंबीयांसमवेत आपल्या शिधापत्रिकेमधील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्याचे सत्यापन म्हणजेच ई केवायसी व्हेरिफिकेशन करून घेणे हे सक्तीचे आहे. अन्यथा ज्या व्यक्तीचे ई वेरिफिकेशन होणार नाही. त्यांचे शिधापत्रिकेमधून नाव वगळल्यास किंवा त्यांचे शिधा धान्य बंद झाल्यास ती सर्वस्वी जबाबदारी ही शिधापत्रिकाधारकाची असणार आहे.

कृपया याची नोंद घ्यावी.सत्यापन म्हणजेच एक ई केवायसी व्हेरिफिकेशन हे बंधनकारक आहेत आणि ई केवायसी करण्याचे अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.

म्हणजेच ज्या शिधापत्रिकेवरती धान्य मिळतं त्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे ई केवायसी म्हणजेच व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. आपण व्हेरिफिकेशन केलं नाही तर आपल्या मिळणार धान्य बंद होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत याची मुदत आहेत जर आपण तोपर्यंत ही व्हेरिफिकेशन केले नाहीत तर आपलं धान्यही बंद होऊ शकते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!