रेल्वेमध्ये पाहुण्यांना बसवायला आला त्याने रेल्वे निघताच असे काही केले, वाचा तुम्हीच पुढे काय घडले
मध्य रेल्वे द्वारा राजधानी एक्सप्रेसमध्ये विनाकारण अलार्म चेन खेचणाऱ्या प्रवाशावर कडक कारवाई
मध्य रेल्वेने नाशिक रोड स्थानकात विनाकारण अलार्म चेन खेचणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली आहे. ही घटना 26.10.2024 रोजी गाडी क्रमांक 22221 डाउन राजधानी एक्सप्रेसमध्ये नाशिक रोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घडली.
अलार्म चेन खेचण्याची (ACP) घटना संध्याकाळी 6:44 वाजता घडली, ज्यामुळे गाडी तीन मिनिटांसाठी थांबली आणि 6:47 वाजता पुन्हा सुरू झाली.
प्रवासी तपस मनींद्र मोहरी (वय 53) आपल्या पत्नी काजल तपस मोहरी (वय 47) आणि मुलगी खुशी (वय 8) यांच्यासोबत नाशिकहून मथुरासाठी प्रवास करत होते. त्यांचे मित्र संजीव रतन चंद पठारिया (वय 48) यांनी प्लॅटफॉर्म तिकीट घेतले होते आणि त्यांनी त्यांना गाडीत चढण्यास मदत केली. गाडी अचानक सुरू झाली आणि संजीव यांना वेळेत उतरणे शक्य झाले नाही,
त्यामुळे त्यांनी गाडी थांबवण्यासाठी अलार्म चेन खेचली. ड्युटीवरील आरपीएफ कर्मचार्यांनी संजीव यांना ताब्यात घेतले, आणि चौकशी दरम्यान त्यांनी विनाकारण अलार्म चेन खेचल्याची कबुली दिली.
संजीव रतन चंद पठारिया यांच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम 141 अंतर्गत (प्रकरण क्रमांक CR 2800/2024) गुन्हा नोंदवला आहे, आणि पुढील चौकशी सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, विनाकारण प्रवासादरम्यान अलार्म चेन खेचू नये. अन्यथा, रेल्वे कायद्याअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.