Life Styleनाशिक ग्रामीणनाशिक शहरमोठ्या बातम्या

कुंभमेळा तारखांची घोषणा…

31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड, नांदगाव,दि.24 ऑक्टोबर-

कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.दर तीन वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर) आणि हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात.

गुरुपुष्यामृत मुहुर्ताचं औचित्य साधुन षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत सागरानंद सरस्वती महाराज,श्रीपंच दशनाम जुना आखाड्याचे मुख्य संरक्षक श्री हरिगिरीजी महाराज,महामण्डलेश्वर शिवगिरीजी महाराज, आनंद आखाड्याचे श्रीमहंत शंकरानंद सरस्वती महाराज,श्रीमहंत गणेशानंद सरस्वती महाराज, साध्वी शैलजा माता आदींसह अनेक साधुसंतांनी कुशावर्त तिर्थामध्ये स्नान करुन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

यावेळी विविध आखाड्यांचे वंशपरंपरागत ऊपाध्ये वेदमुर्ती त्रिविक्रम जोशी,वेदमुर्ती प्रमोद जोशी,जयंत शिखरे,पंकज धारणे आदी उपस्थित होते.यानंतर उपस्थित साधुमहंत तसेच नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर,मुख्याधिकारी संजय जाधव आदींच्या हस्ते कुशावर्त तिर्थावर गंगापुजन करून श्रीगंगामातेला साडीचोळी अर्पण करण्यात आली.यानंतर कुशावर्त चौकामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कुंभमेळा तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आगामी कुंभमेळ्याची घोषणा करण्यात आल्यामुळे त्र्यंबक नगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

31 ऑक्टोबर 2026 रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहन होईल.

प्रथम शाहीस्नान,आषाढ वद्य अमावस्या, सोमवार,दि.2 ऑगस्ट 2027 रोजी असेल. द्वितिय शाहीस्नान,श्रावण वद्य अमावस्या, मंगळवार दि.31 ऑगस्ट 2027 रोजी,तृतीय शाहीस्नान,भाद्रपद शुध्द द्वादशी,रविवार,दि.11 सप्टेबर 2027 रोजी संपन्न होईल तर श्रावण शुध्द तृतीया,सोमवार,दि.24 जुलै 2028 रोजी कुंभमेळा समाप्ती अर्थात कुंभमेळा ध्वजावतरण संपन्न होईल.याप्रमाणे आज तारखांची घोषणा करण्यात आली.

आगामी तारखा जाहीर झाल्यामुळे आता स्थानिक प्रशासन,शासन,धार्मिक संस्था,संघटना यांचे देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन,नियोजन सुरू होईल.काही प्रमाणात उद्योग धंदे,व्यवसायाला चालना मिळू शकेल असे बोलले जात आहे.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!