सिन्नर मधुन आमदार कोकाटे यांना पराभूत करण्यासाठी मोर्चेबांधणी…
शरद पवार यांच्या पक्षाकडून उदय सांगळे यांना उमेदवारी जाहीर !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर , दि.२३ ऑक्टोबर — सिन्नर, दि, अखेर उदय सांगळे यांनी उमेदवारी खेचून आणली आहे. या अनुषंगाने सिन्नर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उदय सांगळे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून तालुक्यांत विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्यात खरी लढत होणार… !
पुजांभाऊ सांगळे यांच्या रूपाने तालुक्याला एक नवीन तरूण तडफदार चेहरा देऊन शरद पवार यांनी वेगळीच चाल करून उदय सांगळे यांना निवडणूकीत उतरवले व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते आ. श्री.माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठीच व्युहरचना आखली आहे.
मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते जयवंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रदिर्घ चर्चेनंतर अखेर…. उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समोर आव्हान दिले असल्याने आता सध्या तरी आ.कोकाटे आणि उदय सांगळे यांच्या त खास लढत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आतापर्यंत तालुक्यातील आजी – माजी आमदारांकडुन तालुक्यात फारसा विकास झाला नाही.. त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये व निवडणूक लढवु नये.. असा जनतेचा सवाल आहे.
शरद शिंदे — स्वराज्य पक्ष तालुकाध्यक्ष सिन्नर
आमदार कोकाटे यांच्या विरोधात सर्वच पक्षांच्या अनेक
नेत्यांनी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत व त्या दृष्टीने वाटचाल करताना दिसत असल्याचं चित्र आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधुन मतदार संघात आपण इच्छुक असल्याचे सांगताना आम्ही निवडुन आल्यानंतर कशाप्रकारे तालुक्यातील विकास करता येईल या बाबतीत सविस्तर माहिती देताना दिसत आहेत . आमदार कोकाटे पराभूत कसे होतील अशी मोर्चे बांधणी केली जाते आहे.. परंतु सगळे जण एकत्र येण्याऐवजी ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची विचार करत असतील तर त्यांना त्याचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.जोपर्यंत सर्व एक होत नाही तोपर्यंत विजया चे स्वप्न साकार व्हायला हवी तशी हवा लागते.. आमदार कोकाटे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावांचा जवळपास सर्वच ठिकाणी दमदार विकास कामांचा समावेश केला आला आहे त्यामुळे कोकाटे हे सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातला ताईत बनले आहेत व त्यांच्या अथक प्रयत्नानंतर सिन्नर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे व त्याचा फायदा लोकांना होत आहे तर मग ” हातचं सोडून ! पळत्याच्या …. पाठीमागे धाऊन काय उपयोग..” असा सूर सर्व स्तरातून गावातील लोकांच्या बोलण्यातुन दिसून येत आहे त्यामुळे विरोधात असणारे उमेदवार किंवा नते यांना हि निवडणूक पाहिजे तेवढी सोपी आहे का? याचाही विचार होणे गरजेचे आहे.
सिन्नर मधुन उदय सांगळे यांच्या रूपाने विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी जेष्ठ नेते श्री शरद पवार यांनी रणनिती आखली आहे.अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात राजकारणातील चाणक्य श्री,शरद पवार यांनी प्रबळ उमेदवार शोधला असुन उदय सांगळे यांच्या हाती ” तुतारी ” दिली आहे. श्री, उदय सांगळे यांनी मुंबई येथील वाया.बी.चव्हाण सेंटर येथे शरद पवार व जयवंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ची सिन्नर येथील राजगड कार्यालयात बैठक झाली असून पक्षाच्या वतीने उमेदवार देणार असल्याचे निच्छित करण्यात आले आहे व त्यात जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे.या नावाला उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले तात्या खरणार यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.श्री.जाधव यांचं नाव जवळपास निश्चित समजून कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने सुचेना देण्यात आल्या असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.
