उबाठा शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रवेशामुळे मंत्री छगन भुजबळ यांना अधिक बळ
उबाठा शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रवेशामुळे मंत्री छगन भुजबळ यांना अधिक बळ
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला,दि.२३ऑक्टोबर:- येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला.
यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या २० वर्षाच्या कालावधीत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली.
त्यांच्या नेतृत्वाखाली येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मंत्री छगन भुजबळ यांचे बळ अधिक वाढणार आहे.
माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रवेशानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये