वेगवान नाशिक / मारुती जगधने
नाशिक, ता. 23 आॅक्टोबर – Maize rate महाराष्ट्र राज्यात २०२३-२४ खरीप हंगामात मक्याचे उत्पादन १४.३९ लाख टन होण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत ५३% कमी आहे. या घटेचे मुख्य कारण अवकाळी पाऊस आणि इतर प्रतिकूल हवामान परिस्थिती आहे. मक्याच्या बाजारभावासंदर्भात, २०२४-२५ साठी मक्याची किमान आधारभूत किंमत (MSP) रु. २२२५ प्रति क्विंटल जाहीर करण्यात आली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत भावात वाढ झाल्याचे दिसते, विशेषतः ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात सरासरी भाव रुपये २००० प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला होता. यंदा मकाने सोयाबीनच्या चांगलीच गालत मारली आहे. सोयाबीन मकाने मागे टाकत शेतक-यांना चांगले पैसे कमवून दिले आहे आणि देत आहे.
स्वस्तामध्ये Maruti Alto k10 दिवाळीत खरेदी करा तेही ऑफर मध्ये
तुमच्या मोबाईल वर एका बाईचा फोन येईल आणि तुमचे पैसे क्षणात गायब होतील
नाशिक ग्रुप Whatsapp Group | Join |
नाशिक जिल्ह्यात खरिप हंगामात मका उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. एकूण 6.65 लाख हेक्टर क्षेत्रांपैकी 2.26 लाख हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे, ज्यात येवला, मालेगाव, नांदगाव आणि बागलाण तालुके प्रमुख आहेत. येवला तालुका मका उत्पादनात आघाडीवर आहे, इथे प्रति हेक्टर 58.16 क्विंटल उत्पादन नोंदवले गेले आहे. इतर तालुक्यांतही उत्पादन चांगले आहे, जसे की निफाडमध्ये 58.05 क्विंटल आणि सिन्नरमध्ये 47.39 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन झाले आहे.
नांदगांव बाजार समिती मध्ये मका शेतमालाची आवक गेल्या आठवड्यापासून दिवसेंदिवस वाढत असून नांदगांव यार्डवर बुधवार दि. २३ रोजी ७५०० क्विंटल आवक झाली असून २ हजार ७४९ सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
नांदगांव तालुक्यासह चाळीसगांव , वैजापूर , कन्नड या तालुक्यातून नांदगांव बाजार समितीचे नांदगांव , बोलठाण व न्यायडोंगरी यार्डवर मोठ्या प्रमाणात मका आवक येत आहे. परंतू परतीच्या पावसाने सध्या नांदगांव तालुक्यात थैमान घातल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याच परिस्थीती मध्ये दिवाळी सण तोंडावर आल्याने शेतकरी वर्ग बाजार समिती मध्ये मका शेतमाल विक्री करणेसाठी आणत असून बाजार समितीच्या कार्यालय परिसरातच शेतमाल विक्रीचे पेमेंट रोख स्वरूपात अदा केले जात असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.
पावसाचे वातावरणामुळे गेल्या दोन दिवसापासून बोलठाण व न्यायडोंगरी यार्डवरील लिलावाचे कामकाज व्यापारी वर्गाच्या विनंतीवरून बंद होते . तसेच नांदगांव यार्डवर मोठ्या प्रमाणात आवक येत असून वाळलेला मका या शेंतमालास कमीतकमी २००० ते २७४९ असा बाजारभाव मिळाला असून सरासरी बाजारभाव २३५० रूपये मिळाला आहे. तसेच पावसाचे वातावरण असल्याने काही प्रमाणात ओली मका विक्रीस येत आहे. त्यामुळे ओल्या मकाला बाजारभाव १४०० ते १७०० असा बाजारभाव मिळाला आहे.
शेतकरी बांधवांना शेतमाल विक्री नंतर रोख स्वरूपात पेमेंट कार्यालय परिसरातच केले जात असून यासाठी नव्याने व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र कॅबिन नांदगांव व बोलठाण यार्डवर उभारण्यात आल्या असून शेतकरी वर्गाने नांदगांव , बोलठाण व न्यायडोंगरी या नांदगांव बाजार समितीच्या यार्डवर मका विक्रीस आणावा असे आवाहन नांदगांव बाजार समितीचे सभापती सतिष बोरसे यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समितीमध्ये मकाला कमीत कमी 1000 जास्त- 2700 सरासरी- 2300 ते 2400 रुपये दराने मका विकली जात आहे. तुम्ही सोयाबीनचा भाव जर पाहिला तर सोयाबीन ही 4200 रुपये दराने विकली जात आहे. मकाचे एकरी 30 क्विंटल निघते तर सोयाबीन फक्त 6 ते 7 क्विंटल निघु लागली आहे. दर वर्ष सोयाबीन 9 ते 10 किंवा त्यापेक्षा जास्त निघत होती. मात्र तेंव्हा मका 1800 रुपये भावाने विकत होती. आज मका 2700 रुपये दराने विकी लागली आहे आणि सोयाबीन 4200 रुपये क्विंटल प्रमाणे त्यामुळे मकाने सोयाबीन मागे टाकून झेंडा रोवला आहे.
मका मुरघास एक मोठा फायदा
अनेक शेतकरी मका दाने तयार करण्याच फंद्यात पडत नाही तर ते मका आडीच महिन्याची झाली की लगेच मुरघास करण्यासाठी विक्री करतात. दुधाळ जनावरांसाठी मक्याचा मुरघास हे सर्वात मोठं वरदान ठरले आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी हे शेतात जावून मका खरेदी करतात. त्यामध्ये एकरी किंवा पांड अथवा गुंठ्यावर भाव ठरल्या जातो. मुरघासामुळे मक्याचे शेत त्वरीत खाली होते. त्यामुळे शेतक-यांना चार महिने मकाचे दाने भरण्याची वाट पाहण्याची वेळ येत नाही. आणि मका कमी होईल की जास्त यांची चिंता नसते.