सोन्याचे दर कोसळले , चांदी मात्र सुसाट
वेगवान नाशिक / दिपक पांड्या
नवी दिल्ली, ता. 23 – gold price सोनं हे प्रत्येकाचा आकर्षण आणि गुंतवणुकीचा महत्त्वाचा पर्याय असल्यामुळे अनेक भारतातील लोक सोन्याकडे कल वाढवित आहे. आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करावा असा लोकांना वाटते. कारण सोनं ही दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. अगदी कमी भावात असणारे सोन्याचे भाव आज गगनाला भिडलेत. सोन्याचे दर थांबायचं नाव घेत नव्हते मात्र आज सोन्याच्या दराला अचानक ब्रेक लागलाय. दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याला ब्रेक लागल्यामुळे सर्वांच्या नजरा टिकून आहे. Gold prices fell, but silver remained stable
प्रथम लोक बँकेमध्ये पैसा टाकून त्याचा व्याज मिळवत असत मात्र आता लोक दिवसेंदिवस हुशार झालेले आहेत आणि सोन्यावरती चांगला परतावा मिळू शकतो. म्हणून कमी पैशात सोनं घेतल्यानंतर एका वर्षामध्ये त्याचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतात आणि याचा फायदा सोनं घेणाऱ्या ग्राहकांना आणि गुंतवणूक करून ठेवलेल्या लोकांना होतो. त्यामुळे आता लोक सोन्याकडे एक वेगळा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आणि एक सोनं दागिणा म्हणून पाहिले जाते.
भारतामध्ये आज सोन्याच्या भावामध्ये किरकोळ अशी घसरण झालेली आहे. दहा ग्रॅमच सोन्याचा भाव शंभर रुपयांनी तुटलेला आहे. आज दिल्ली नोएडा गाजियाबाद लखनऊ आणि जयपूर यास उत्तर भारतातल्या मुख्य शहरांमध्ये 24 कॅरेट सोनं 79 हजार 700 रुपयांच्या जवळपास होतं आणि 22 कॅरेट चा रेट जर आपण बघितला तर 72 हजार 900 रुपयांपर्यंत सोनं राहिलं. त्याच बरोबर चांदीचा जर विचार केला तर 1 लाख २१०० पर्यंत चांदीचे भाव राहिले. दिवाळी मध्य सोन्याचे भाव अजून कमी होणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये सोन्याचे 24 कॅरेटचे भाव जे होते ते 79 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम साठी होते. आणि 22 कॅरेट चा रेट जर आपण मुंबईचा बघितला तर तो ७२९९० रुपये प्रति दहा ग्रॅम चा आहे.
सोन्याचे भाव कमी झालेले असले तरी मात्र चांदीची (silver ) चमक मात्र कमी व्हायला तयार नाही. कारण चांदीचे भाव टिकून ठेवलेले आहेत. आज पण चांदीच्या भावामध्ये तेजी दिसून आलेली आहे. जर आपण पाहायला गेलं तर चांदीचा दर हा एक लाख 2 हजार 100 रुपये पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. काल चांदीचा भाव पंधराशे रुपयांनी वाढवून तो एक लाखांवरती घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरला.
का वाढताय सोन्याचे व चांदीचे दर
सोनं- चांदी भावामध्ये वाढ होण्याचे कारण जे आहे ते म्हणजे इंडस्ट्रियल डिमांड आहे. आणि याच्या व्यतिरिक्त दागिने जे आहेत त्या दागिन्याचे भांडे याची डिमांड वाढत चाललेली आहे. त्यामुळे आता सोन्याचे भाव जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहेत. लग्नाचा सिझन सुरू होणार असल्यामुळे सोन्याचा जे आहे ते मार्केट मोठ्या प्रमाणात वाढत जातं