केदा आहेर ढसा ढसा रडले… आमदार राहुल आहेर कपटी हो..कपटी..
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
चांदवड, ता. – राजकारणात कधी काही होऊ शकतं सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. यालाच राजकारण म्हणतात राजकारणात कोणीच कुणाचे नसते. भाजपा तर्फे आमदार राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केदा आहेर पेटून उठलेले आहेत. आज चांदवड येथे घेण्यात आलेला जाहीर मेळाव्यामध्ये आज राहुल आहेर यांचे कार्यकर्ते हे केदा नाना आहेर यांच्या व्यासपीठावर दिसून आल्याने आता राजकारण चांगलेच तापून उठले आहे.
फक्त 2 लाख 99 हजार हुंडाई कार झाली लॅान्च
चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघासाठी केदा आहेर अनेक दिवसांपासून मोर्चे बांधणी करत आहेत. राहुल आहेर यांना दोन वेळा संधी दिल्यानंतर केदा आहेर यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्त्यांनी वाटत होतं की या वेळेची विधानसभेची उमेदवारी राहुल आहेर यांनी मागे होऊन केदा आहेर यांना देण्यात यावी, मात्र राहुल आहेर यांनी उमेदवारी देण्यासाठी पक्षाकडे आग्रही धरला. मात्र भाजपा पक्षांनी उमेदवारी केदा आहेर यांना न देता विद्यमान आमदार राहुल आहेर त्यांना दिली यामुळे नाराज झालेले केदा आहेर याचे खापर राहुल आहेर यांच्यावर फोडत. कोणी उभे राहिले तरी चालले पण तु माझ्या समोर उभं राहु नको, असे म्हणतं केदा आहेर हे भावनिक होत केदा आहेरांना रडू कोसळले.
चांदवड मद्ये काय बोलले केदा आहेर
माझ्यावर अन्याय झालेला तुम्हाला आवडला नाही. माझा राहुल दादा शांत, संयमी, पण आता तुम्हाला कळाले की तो कपटी आहे. तुमच्यासाठी मी दहा वर्ष धावलो. माझी अवहेलना केली गेली. चांदवडची पत्रकार परिषद होण्या अगोदर राहुल आहेरांची उमेदवारी भाजपा पक्षाकडून दिल्लीवरुन फिक्स होती झाली होती. हा त्याचा पुरावा. तरी राहुल आहेर यांनी सांगितले की मी केदा आहेर यांना उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे विनंती केली. असा खोटा आव राहुल आहेर यांनी आणला. ही आल्यादेवीची भूमी आहे. मी जनतेच्या न्यायालयात आलोय. तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य आहे. काय करायचे ते सांगा.. मी आता लढणार…येथे कोणी पैसे देऊन आणले नाही. उद्या हे म्हणतील. कारण हे राजकारण फार घाणरेड आहे.
मी कार्यकर्त्यांना तळ हाताच्या फोडासारखे जपतो. मला कोणा मार्फत येण्याची गरज नाही. तुम्ही थेट माझ्याकडे यायचे. आणि मी तुमच्यासाठी आहे. शिरीष कोतवालांचे नाव न घेता टिका. एक जण सात आठवेळा उभा राहिला तरी थांबत नाही आणि हाा दोन वेळा निवडणून आला तरी थांबत नाही. त्यामुळे दुस-यांदा संधी द्यायची की नाही. पण मी उद्या देवळा येथे मेळावा घेणार आहे. देवळा येथे लोकांचे काय मत आहे.मी जाणून घेईल, आणि तुमची उर्जा घेऊन मी पुढे जात आहे. येणा-या काळात आपण पुढे जाऊ. बाप दाखव नाहीतर श्रध्द कर असा मी आहे. मी साम, दाम, दंड सगळ वापरतो. मी वाईट नाही. मी फक्त नारळासारखा आहे.