नाशिकचे राजकारण

नाशिक भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी…जाणून घ्या काय आहे कारण

लाभाची पदे आयाराम गयारामांना दिल्याने एकजुट


भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते विधान परिषद व महामंडळे करता एकवटले.

भाजपमध्ये अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत असलेले जुने कार्यकर्ते आयाराम गयारामांच्या विरोधात एकवटले असुन आम्हाला सतत गृहीत धरल्यास पक्षाचे नुकसान होईल अशी चर्चा सुरू आहे.

फक्त 2 लाख 99 हजार हुंडाई कार झाली लॅान्च

इतर वेगवेगळ्या पक्षामधुन भाजपात आलेले काही जण पक्षाला वेठीस धरून वेगवेगळे आश्वासने पदरात पाडून घेत आहेत. असे प्रकार चुकीचे असून पक्षाला घातक असल्याचे जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

बॅंक कर्ज देत नसेल तर एवढ करा, बॅंक पायाचं पडेल तुमच्या

यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पक्षाचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक पदाधिकारी व नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले तरी त्यांना पक्षामधून काढले नाही तर उलट वेगवेगळे लाभाचे पदे देऊन बक्षिसी दिली.

यामुळे मुळ भाजपचे कार्यकर्ते नाराज असुन काहींनी उघडपणे बोलण्यास सुरुवात केली आहे. आम्ही ३०,४० वर्षे भाजपचे काम प्रामाणिकपणे करूनही आम्हाला कुठलेही पदे मिळाली नाही. उलट मागील ५ ते १० वर्षात इतर पक्षामधून आलेल्या उपऱ्याना लाभाची मोठ मोठी पदे दिली.यामुळे नाशिक जिल्ह्यात भाजपची पक्ष संघटना खिळखिळी झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

यामुळे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांचा हाच का तो भाजप पक्ष असा प्रश्न पडला असल्याचे जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान या प्रकरणाला जुने कार्यकर्ते, पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी उघडपणे वाचा फोडली असुन त्यांच्या विचाराबरोबर आम्ही सर्व जुने कार्यकर्ते पदाधिकारी सहमत असल्याचे जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याविषयी वेळोवेळी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!