शेती

कांद्याच्या रोपापासून आता कांदा तयार होणार नाही onion plant

कांद्याच्या रोपापासून आता कांदा तयार होणार नाही An onion plant will no longer produce an onion


वेगवान नाशिक /  एकनाथ भालेराव

नाशिक, ता. 22 – भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक कांद्याचे उत्पादन करणारे राज्य आहे.त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन करणारे नाशिक  आहेत. मात्र कांद्याच्या बाबत मोठी बातमी समोर येत आहेत ती म्हणजे ज्या शेतक-यांनी कांदा बियाणे टाकले त्याचे रोप तयार झाले नाही. आणि ज्याचे रोप तयार झाले त्यांचे कांदे येणार नाही. कारण ते बियाणे बोगस असल्याचे समोर आले आहे. नेमकं काय प्रकार आहे ते आपल्याला समजून घेणे गरजचे आहे. An onion plant will no longer produce an onion

फक्त 2 लाख 99 हजार हुंडाई कार झाली लॅान्च

त्यात भारतात नाशिक चा लाल कांदा व गावठी कांदा चवी साठी प्रसिद्ध आहेत. नाशिक जिल्ह्यात वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते. नाशिकचे कांदे उत्तम चव साठी व टिकवणुकी साठी भारतात प्रसिद्ध आहे, असे असताना महाराष्ट्रातील  कांदा संकटात सापडला आहे.

फक्त 2 लाख 99 हजार हुंडाई कार झाली लॅान्च

शेतकरी विविध विक्रेत्यांकडून तसेच खाजगी बियाणे खरेदी करत असतात. त्यात अनेकदा बोगस बियाणांच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

परतीच्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात कांदा रोपे, कांदा चे नुकसान झाले आहे . शेतकऱ्याने परत पुन्हा मोठ्या अपेक्षेने महागड्या बियाणांची खरेदी करून पेरणी करत आहे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच बोगस बियाणांचा सुळसुळाट झाला असल्याचा तक्रारी येत असल्याने खळबळ उडाली आहे.


राज्यातील शेतकरी परतीच्या पावसाबरोबर वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असतानाच बोगस बियाणे विकणाऱ्यांचाही राज्यात सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा झटका फटका बसत आहे.

एकीकडे शेतकऱ्यांवर चहूबाजूंनी संकट येत असतानाच पेरणी करण्यासाठी बियाणे खरेदी केल्यानंतर मात्र काही बियाणे बोगस निघत आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांवर निसर्गाचे संकट तर दुसरीकडे बोगस बियाणांची पेरणी झाल्यामुळे योग्यरित्या उगवण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकटात सापडला आहे .

नाशिक जिल्ह्यात बोगस कांदा बियाणे सापडले

मे.राही नॅचरल सिडस प्रा.लि. पिंपोडे बु तालुका कोरेगाव या बियाणे उत्पादक कंपनीचे नाव वापरून तीर्थ एजन्सी इंदोर यांनी फुरसुंगी प्लस ह्या नावाने बनावट बियाणे वाण तयार करून ते नाशिक जिल्हात व परीसरात विक्री होत असल्याची माहिती नाशिक जिल्हा गुण नियंत्रण भरारी पथकास मिळाली होती.

मे.राही नॅचरल सिडस प्रा.लि.च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत भरारी पथकाने सायखेडा तालुका निफाड येथील ग्रो ऍग्रो सॉल्युशन या कृषी सेवा केंद्रामध्ये छापा टाकून रक्कम रुपये ३१२००/-ची बनावट कांदा बियाणे पाकिटे भरारी पथकाने पकडले.

सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक,
कैलास शिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक, संजय शेवाळे, कृषी विकास अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली
मध्यप्रदेशातून नाशिक आणि लगतच्या तालुक्यांमध्ये कांदा बियाण्याची तस्करी रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी कारवाई कृषी विभागाने केली आहे.

मे. रोहित घुगे, ग्रो ऍग्रो सोल्युशन सायखेडा व तीर्थ एजन्सिज, इंदोर यांच्या विरोधात बियाणे कायदा १९६६,बियाणे नियम १९६८ व बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये सायखेडा पोलीस स्टेशन येथे श्री.जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक, यांनी गुन्हा नोंदवीला.

या कारवाईसाठी श्री. दिपक नानासाहेब सोमवंशी, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, राही नॅचरल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

नाशिक जिल्ह्यात पुरेसे कांदा बियाणे पाकिटे उपलब्ध झालेली असल्याने शेतकऱ्यांनी बनावट, अवैध व विनापरवाना कांदा बियाणे खरेदी करू नये.
कांदा बियाणे तसेच इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना परवानाधारक निविष्ठाविक्रेत्यांकडूनच खरेदी करावी तसेच खरेदी करताना पक्क्या बिलाची मागणी करावी
याबाबत काही गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक, श्री कैलास शिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक,श्री संजय शेवाळे, कृषी विकास अधिकारी नाशिक यांनी केले आहे

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!