नाशिकचे राजकारण

देवळालीतून महायुतीच्या या उमेदवाराला थेट एबी फॉर्म

आमदार सरोज आहेर पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात


वेगवान नाशिक/Wegwan Nashik

विशेष प्रतिनिधी, २२ ऑक्टोबर- 

देवळाली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सरोज आहिरे यांना मंगळ्वारी (दि.22) पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला.

फक्त 2 लाख 99 हजार हुंडाई कार झाली लॅान्च

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

यावेळी देवळाली मतदारसंघातील पदाधिकारी आ. आहिरे यांच्यासह उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच संभाव्य यादीमध्ये आ. आहिरे यांचे नाव समोर आले होते. मात्र औपचारिकता बाकी होती. मंगळ्वारी आ. आहिरे यांना एबी फॉर्म मिळाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला.

कांद्याच्या रोपापासून आता कांदा तयार होणार नाही onion plant

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपने सर्वात प्रथम रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाने यादी जाहीर करण्याएवजी विद्यमान उमेद्वारांना थेट एबी फॉर्म देत आहेत.

बॅंक कर्ज देत नसेल तर एवढ करा, बॅंक पायाचं पडेल तुमच्या

सोमवारी नाशिक जिल्हयातील राष्ट्रवादीच्या आमदारांना उपमुख्यमत्री अजित पवारांनी एबी फॉर्म देण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांना उपमुख्यमंत्री पवारांनी देवगीरी बंगल्यावर एबी फॉर्म दिला.

दरम्यान एकीकडे देवळाली विधानसभा मतदारसंघातून आ. सरोज आहिरे यांच्यासमोर महाविकास आघाडीला अद्याप उमेद्वार सापडलेला नाही. आ. आहिरे यांनी गत पाच वर्षात चौदाशे कोटींची कामे मतदारसंघात आणत विविध कामे केली असून कित्त्येक वर्षापासून अनेक गावे विकासाच्या प्रतिक्षेत असताना ती मार्गी लावली.

त्यामुळे देवळालीत न भूतो अशी विकासकामे झाल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जातो आहे. 2019 साली आ. आहिरे यांनी माजी मंत्री बबन घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांचा एकतर्फी पराभव करत मोठया मताधिक्यांनी देवळालीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावत शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का दिला होता.

जनता जनार्दन पाठीशी असल्यानेच आजपर्यतचा प्रवास करु शकले. पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्वास दाखवल्याने त्यांचे आभार. पाच वर्षात मतदारसंघाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे त्यांची कामे केलीत. त्यामुळेच मतदारसंघात हजार कोटीहून अधिकची विकासकामे झाली.

-आ.सरोज आहिरे, देवळाली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!