नाशिक सह महाराष्ट्रात मायंदळ पावसाचा कहर सुरु (व्हिडीओ)

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
नाशिक,ता. 21 आॅक्टोबर 2024- नाशिक सह महाराष्ट्रात जोरदार पावसाचा कहर सुरु असून अनेक ठिकाणी ढगफुटीचा पाऊस पडत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेती पिकं संपल्यात जमा आहे.
महसुल विभागामार्फेत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अनेक शेतक-याचे शेत पाण्यात वाहून गेले आहे. वादळी पावसाने शेती पिकां बरोबर मुके जनावरे, शेळ्या गाई, ट्रेकटर, बंधारे, शेती चे प्रचंड नुकसान केले आहे.
अनेक गावांमध्ये शेतीच वाहून नेली आहे. मका, डाळींब, कांदे, केळी, कांदा रोपे भात, फळबागा भाजीपाला चे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच
अनेक नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेती बरोबर पिके नद्या नाल्याना वाहून गेली आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात ट्रैक्टर, ट्रॉली, शेती उपयोगी अवजारे, विद्युत खांबे, मोटारसायकल आदी वाहून गेल्याने शेतकरी आता भयानक संकटात सापडला आहे .
नाशिक जिल्ह्याला संपूर्ण ढगांनी वेढलेला आहे. नाशिक जिल्ह्यात संपूर्ण ढग जमा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागामार्फत वार्तविला आहे.
राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे. पुढील तीन दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागांनाे वर्तवलाय. यामध्ये कोकण, मध्ये महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश, आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
या दरम्यान विजा आणि ढगांचा गडगडात होऊ शकतो असा हवामान विभागाचा म्हणणं आहे. कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारपासून अनेक भागांमध्ये पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी गुरुवारी कोकण ,मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहेय विदर्भ, बुलढाणा, अकोला, अमरावती, आणि वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल.
खालील व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आहे.
