पावसासोबत आता महाराष्ट्रात गारपीटःहवामान विभागाचं अपडेट आलं
पावसासोबत आता महाराष्ट्रात गारपीटःहवामान विभागाचं अपडेट आलं

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
नाशिक, 20 ऑक्टोबर /महाराष्ट्रतात पावसाने झोडपले आहे आता तर शेतीच अवघडच झालं आहे मका, कांदा पीक, कपाशी, भाजीपाला, कांदा रोपे, सम्पूर्ण शेती पिके पाण्याखाली गेली आहे. along-with-the-rains-now-there-is-an-update-of-hailstorm-in-maharashtra-weather-department
राज्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटीचा पाऊस झाल्याने धरण फुटले असून यामुळे मोठं नुकसान झालेले आहे विहीरी वाहून गेल्या तर धरण फुटल्याने ट्रॅक्टर सुध्दा पाण्यात वाहून गेलायं.
तसेच काही ठिकाणी छोटे मोठे बंधारे पावसाने फुटले आहे परतीच्या पावसाने शेती पिके सम्पूर्णतः उध्वस्त होत असताना त्यात आता एक नवं संकट शेतकऱ्यांनपुढे उभे ठाकले आहे.
मात्र मान्सून माघारी फिरला असला तरी देखील पावसाचे सत्र मात्र पूर्णपणे थांबलेले नाही. अजूनही राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
हवामान अंदाज,
भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे
मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील पावसाचे दि.२३ ऑक्टोबरपर्यंतच्या सात दिवसा(१७ ते २३ ऑक्टोबर)दरम्यानचे दुसऱ्या आवर्तनात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होत असुन बुधवार दि. २३ ऑक्टोबर पर्यन्त ह्या पावसाची शक्यता कायम आहे
विशेष म्हणजे शनिवार दि. १९ ऑक्टोबर पासून पुढील दोन दिवस म्हणजे १९-२० ऑक्टोबर (शनिवार- रविवार) दरम्यान खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
गारपीटीची शक्यता कशामुळे निर्माण झाली
रत्नागिरी जिल्ह्याच्या समोर खोल अरबी समुद्रात व थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर बं. उपसागरातील दोन्हीही समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीतून सह्याद्रीच्या पूर्व बाजूला संपूर्ण मध्य महाराष्ट्रादरम्यान होणारा वाऱ्यांचा संयोग तसेच मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून ५.८ किमी. उंचावर तयार झालेला ‘ व्हर्टिकल विंड शिअर ‘ (एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या असमान वेगवान वाऱ्याचा व्हर्टिकल शिअर झोन) मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून ५.८ किमी. उंचावर, उत्तर दिशेकडून २० डिग्री अक्षवृत्त दक्षिणे पर्यंत पर्यन्त सरकलेले बळकट पश्चिमी वारे ह्या वातावरणीय घडामोडीमुळे गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे.
सद्या जे वातावरणात बदल होत आहे त्यात गारपीठ ला पोषक वातावरणात होत आहे. असे जानकारांचे मत आहे. त्यामुळे पावसासोबत गारपीटाचा सामना शेतक-यांना करावा लागू शकतो.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये