वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक 19 ऑक्टोबर /नाशिक जिल्ह्यातील कांदा पट्ट्यात गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे कांदा पट्ट्यातील शेतातील गावठी कांदा रोपात व लाल कांदा पिकात मर रोगाची, करपा रोगाची मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे
. सतत पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे गावठी कांदा रोपे, लाल कांदा पीक सडून वाया जाण्याचा धोका मोठया प्रमाणात वाढला आहे.
त्यामुळे कांद्याचा होणार वांधा
नाशिक जिल्हा दर्जेदार कांदा पिकवण्यासाठी भारतात प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा पट्ट्यातील गावठी कांदा हा काढणी नंतर सहा ते आठ महिन्यापर्यंत चाळीत साठवणूक करून शेतकरी ठेवतात व योग्य बाजारभाव मिळाल्यावर विक्री करतात.
या दर्जेदार गावठी कांद्याची रोपे या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात बनवली जाते . नाशिक जिल्यातील कांदा पटयातील शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणात गावठी कांदे लागवडी साठी कांदा बी पेरून व टाकून कांद्याचे रोपे तयार करण्यासाठी शेतात टाकलेली आहे.
मात्र परतीच्या पावसामुळे शेतातील कांदा रोपे वाया गेली आहे. व त्याच बरोबर लाल व रांगडा कांदा पीक सुद्धा वाया जात आहे त्यामुळे कांदे लागवडी वर परिणाम होणार आहे
त्यात जर खराब वातावरणामुळे कांदा रोपच तयार होणार नसल्यामुळे आपोआप कांदा लागवड कमी होणार असल्याचे चिन्हे तयार झाले आहे या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे जेरीस आला आहे
त्यामुळे कांदा रोपाच्या भावात मोठी वाढ होणार आहे व उत्पादन खर्च ही वाढणार आहे जर हा पाऊस अजून काही दिवस पडत राहिला तर कांदा रोपांचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे
त्यात मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, येवला, चांदवड, नांदगाव व सिन्नर तालुक्यांतील कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले गावठी कांदा बियाणे रोपे मोठ्या प्रमाणात खराब वातावरणामुळे नाहीसे झाल्याचे दिसून येत आहे.
बुरशीजन्य रोगांचा विळखा वाढला असून, वाचलेली थोडीफार उरलेली रोपेही पडणाऱ्या धुक्या मुळे नुकसानीच्या विळख्यात सापडली आहे.
रोपे तयार करण्यापूर्वीच कांदा बियाण्यांची टंचाई निर्माण झाली होती. त्यातच आता पुन्हा नुकसान झाल्याने बियाणे आणायचे कुठून, हा मोठा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
त्यामुळे पुन्हा बियाण्यांची शोधाशोध करून मिळेल तेथून बियाणे आणून व दुबार खर्च करून कांदा रोपवाटिका चा जुगार शेतकऱ्यांना करावा लागणार असल्याचे चित्र शेतकरी करत आहे त्यातही हवामानाने साथ दिली तरच गावठी कांदा लागवड शक्य होणार नाहीतर कांद्याचा वांधा होणार असल्याचे सद्या तरी वातावरणावरून दिसत आहे,
अजूनही परतीचा पाऊस काही भागात वादळी वाऱ्यासह जोरात कोसळत आहे त्यामुळे आता तर कांदा पीक च नष्ठ होण्याच्या मार्गांवर आहे त्यात रोज पहाटे सातत्याने पडणाऱ्या धुईने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून कांदा पीक धोक्यात आले आहे.
फवारणी करुनही कांदा उभारी घेण्याची शक्यता नसल्याने यावर रोटावेटर फिरवण्या शिवाय पर्याय नाही असे शेतकरी बोलून दाखवत आहे अशा संकटात कांदा उत्पादक सापडला आहे या वर्षी कांदा भाव वाढल्याने उत्पादन क्षेत्र वाढले असताना कांदा उत्पादक समोर धुईचे नवे संकट ओढावले आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये