राज्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई देणे गरजेचे
राज्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई देणे गरजेचे
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक 19 ऑक्टोबर/परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून सोयाबीन, मका, कापूस, कांद्याचे रोपे, काढणीला आलेला कांदा, भाजीपाला सह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पीक कापणीच्या वेळेस परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला आहे.
अतोनात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावल्यानं शेतकरी हताश झाला आहे.
या पावसामुळं काढणीला आलेल्या कांदा रोपे,कांदा, मका, कापूस, सोयाबीन, भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे.
त्यामुळं शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेल्यानं बळीराजा हताश झाला आहे.जवळपास सर्व पीकेच नष्ट होण्याच्या मार्गांवर झाली आहेत.
शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे…राज्यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याबद्दल विचार करणे गरजेचे आहे तरच शेतकरी वाचू शकेल अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये