मोठी बातमीः चांदवड मध्ये ढगफुटीचा पाऊस, गाड्या बुडाल्या, दुकानात पाणी (व्हिडीओ )
वेगवान नाशिक / अ रुण थोरे
चांदवड, ता. 19 आॅक्टोबर 2024- नाशिक जिल्हात ठिक ठिकाणी काल दिनांक १८ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यात काढणीला आलेल्या पिकांसह द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. यामुळे आता पावसाला शेतकरी धास्तावल्याची परीस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने नुकसान झाले असून,टोमॅटो व इतर पिके धोक्यात आली आहे.
जिल्ह्यात बर्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून चांदवड येवला नांदगाव आधी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली असून तर कुठे कांदा लागवड सुरू असल्याने, माती झालेल्या पावसामुळे कांद्यांची मुळे सडण्याची भीती निर्माण झाली आहे तसेच निफाड व दिंडोरी आदी द्राक्ष उत्पादक तालुक्यात छाटणी करून झालेली द्राक्ष बागा धोक्यात येण्याची शक्यता असल्याने परतीच्या पावसाला शेतकरी धास्तावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हवामान विभागाने अजूनही पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज असल्याचे वर्तवल्याने अजून किती पाऊस होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चांदवड मध्ये गाड्या बुडाल्या ,दुकान पाणी घुसले.
चांदवड तालुक्यामध्ये ढगफुटीचा पाऊस झाला असून चांदवड शहरांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे चांदवड शहरात तुफान पाऊस सुरू असल्यामुळे चांदवड शहरांमध्ये बाईक जे आहे त्या पाण्याखाली बुडालेले आहेत.
एवढेच नाही तर दुकानांमध्ये कमरेपर्यंत पाणी घुसल्याने दुकानदारांच्या मोठ्या नुकसान झालेल्या आहेत. रेणुका कॉम्प्लेक्स मधील अभिजीत शेडगे व पंकज वाघ यांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने त्यांचा लाखो रुपयांचा माल भिजला आहेत.
त्यामुळे आता शेतकऱ्यांवरती हे मोठ संकट पाऊस घेऊन आलेला आहे. चांदवड शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांच्या मोठ नुकसान झाला आहे.
चांदवड शहरांमध्ये रस्त्यांवरून पाणी दिसेल त्या मार्गाने मार्गक्रमण करताना आपण व्हिज्युअल मध्ये पाहू शकतात व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणात चांदवड शहरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहेत एवढेच नाही चांदवडच्या ग्रामीण भागाचा नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने झोडपलेला आहे.
कापशी ता. देवळा येथे ढगफुटी. प्रचंड वीजा मागील एक ते दीड तासापासून अतिशय जोरदार पाऊस सुरु आहे.
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आज इतिहासातील सर्वात जास्त पाऊस. प्रचंड नुकसान हे आधीच झालेले आहे. आज तर काहीच सांगता येत नाही. नेट पण बंद आहे. Light पण नाही. सर्व शेतीचे बांध फुटून पाणी नद्यासारखे वाहत आहे. जमीन सुद्धा शिल्लक राहणार नाही तिथे पिकांचा विचारच नाही. अशी अवस्था झाली आहे.
View this post on Instagram