नाशिक ग्रामीण

येवल्याचा विकास हा पूर्ण विराम नाही तर अल्पविराम – मंत्री छगन भुजबळ

येवल्याचा विकास हा पूर्ण विराम नाही तर अल्पविराम - मंत्री छगन भुजबळ


वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव

येवला, दि.२० ऑक्टोबर :- वर्षानुवर्ष दुष्काळाच्या संकटातून मार्गक्रमण करीत यातून वाट काढणाऱ्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाला सर्व अगांनी सर्वोत्तम बनविण्यासाठी गेली वीस वर्ष झगडत आहे. यापुढील काळात यापेक्षाही सर्वोत्तम आणि समृद्ध मतदारसंघ म्हणून येवल्याला ओळख मिळवून देणार असून मतदारसंघात सुरु असलेला विकासरथाचा प्रवास हा पूर्ण विराम नाही तर अल्पविराम असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज येवला येथील संपर्क कार्यालयात बैठक संपन्न झाली.

बैठकीच्या प्रारंभीच मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा उमेदवारी करावी असा आग्रह सुरु केल्याने पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाचा स्वीकार करत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

त्यानंतर भाजप नेते माजी जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप यांनी ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर यांच्याकडे प्रचार प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात यावी अशी सूचना मांडली. त्यास येवला विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, भाऊसाहेब भवर, साहेबराव मढवई यांनी अनुमोदन दिले

या बैठकी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विश्वासराव आहेर, तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई, निफाड पूर्व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, भाजपा नेते डि.के जगताप.

अरुण थोरात, शेखर होळकर, अशोकराव नागरे, सुवर्णा जगताप, मोहन शेलार, एलजी कदम, गणपतराव कांदळकर, दत्तू पाटील डुकरे, दत्तात्रेय रायते, भाऊसाहेब बोचरे, भाजपा तालुका अध्यक्ष नानासाहेब लहरे, शिवसेना नेते किशोर सोनवणे, राजू परदेशी, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी.

विनोद जोशी, बबनराव साळवे, शिवाजी सुपनर, मच्छिंद्र मोरे, विनायक भोरकडे, अण्णा दौंडे, डॉ.बेलावडे, राजू कांबळे, जमील शेख ,चंद्रकांत देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीसह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!