येवला लासलगाव मतदार संघात असा असेल निवडणूकीचा तामझाम
येवला लासलगाव मतदार संघात असा असेल निवडणूकीचा तामझाम
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक 18 ऑक्टोबर /विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
या वेळी येवला-लासलगाव मतदारसंघात २२८ केंद्र असून, तीन लाख २२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी संपूर्ण नियोजन झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे, सहाय्यक अधिकारी आबा महाजन यांनी दिली.
दरम्यान, मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत सुमारे २६ हजार मतदार व १६ मतदान केंद्र वाढले
आहेत. मतदार केंद्र वाढल्याने मतदारांची गैरसोय दूर होणार आहे. येवल्यातील १२५ व निफाडमधील ४६ अशी १७१ गावांचा मिळून या मतदारसंघाची रचना झालेली आहे. मराठवाड्याच्या हद्दीपासून ते थेट निफाड,
तीन ठिकाणी चेकपोस्ट
गटविकास अधिकारी संदीप वायाळ व मुख्याधिकारी तुषार आहेर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील.
याशिवाय ३२८ बीएलओ, ३० पर्यवेक्षक, ३२ क्षेत्रिय अधिकारी नेमलेले आहेत. विशेष म्हणजे तब्बल १६४ केंद्रावर थेट वेबकास्टिंग होणार असल्याने मतदान प्रक्रिया लाईव्ह होईल. याशिवाय विंचूर बसस्थानक, पिंपळगाव जलाल टोल नाका व गवंडगाव येथे चेकपोस्ट उभारले जाणार असून, नऊ भरारी व स्थिर सर्वेक्षण पथक, तर तीन व्हिडिओ सर्विलांस पथक कार्यरत राहणार आहे.
वैजापूरच्या हद्दीपर्यंत मतदारसंघाचा विस्तार असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या सहा ते सात भागात हा मतदारसंघ विभागल्याने निवडणूक काळात प्रशासनासह उमेदवारांना मोठी यंत्रणा
उभी करावी लागते. या मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एक लाख ५६ हजार २८३ पुरुष, तर एक लाख ४० हजार ५२० महिला व दिव्यांग ८०३ असे दोन लाख ९६
हजार ८०३ मतदार होते. त्यावेळी मतदारसंघात ३१२ मतदान केंद्र होती. मागील पाच वर्षात यात मोठा बदल झाला असून, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या ३१८, तर मतदारांची संख्या तीन लाख १२ हजार होती. मात्र, विधानसभेसाठी प्रशासनाने नव्याने रचना केली असून, लोकसभेच्या तुलनेत आता दहा केंद्र वाढली आहेत. यात येवला शहरासह टाकळी विंचूर, पारेगाव, रुई, बोकडदरे, धामणगाव, तळवाडे, ममदापूर, खिर्डीसाठे, चिंचोडी या ठिकाणी प्रत्येकी एक केंद्राची वाढ झाली असून, आता येथे दोन ते तीनपर्यंत केंद्र संख्या झाली आहे.
वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत हे केंद्र वाढल्याने एकूण केंद्र ३२८ झाली आहेत. तसेच, २०१९ च्या तुलनेत सुमारे २६ हजार मतदार वाढले आहे. बहुतांशी स्थलांतरित मतदार देखील वगळले गेले असून, यादी अद्ययावत करण्यात आली आहे. मतदारसंघात एक लाख ६७ हजार ४२४ पुरुष, एक लाख ५४ हजार ७९२ महिला असे तीन लाख २० हजार ९८९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एका मतदान केंद्रावर १४५० पर्यंत मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांची वाढ गृहीत धरून मतदान केंद्रात वाढ झाल्याचेही दिसते.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये