राजा ठरत नाही तो पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे नाही
राजा ठरत नाही तो पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे नाही Chief Minister's Beloved Sister Yojana Update
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 18 आॅक्टोबर 2024- Ladki Bahini Yojana Maharashtra Update महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करून महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सर्वांना मोठा धक्का दिला आहे. लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देऊन महायुतीच्या या तीनही नेत्यांनी आज मैदान गाजवलेला आहे महिलांच्या खात्यावरती दरमहा पंधराशे रुपयाची मदत मिळत असल्यामुळे महिलाही प्रचंड प्रमाणात खुश आहे महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये येऊन पोहोचले आहे.
दर महिन्याला आपल्या खात्यावरती पंधराशे रुपये येतात त्यामुळे महिलांनी आता या पैशाची लालच लागलेली आहे. कोणताही टेक्स मेसेज असो अथवा मोबाईलचा मेसेज, आवाज होताच महिला आपल्या मोबाईलचा मेसेज पटकन चेक करतात आणि त्यांचे पतीराजाही कोणता मेसेज आला हे बघतात. कारण कधी लाडक्या बहिणीचे पैसे येऊन पडतील याचा नेम नाही. असाच आता महिलांना वाटू लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीने धुमाकूळ घातलाय.
एकनाथ शिंदे सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक हातभार लावलेला आहे. आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते महिलांना देण्यात आलेले आहे. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते एकत्रित देण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर चा एक हप्ता स्वतंत्रपणे महिलांच्या खात्यावर टाकण्यात आला. पुढील निवडणूक व अचार संहिता डोळ्यासमोर ठेवून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे ॲडव्हान्स पैसे महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुन्हा वितरित केले.
खात्यावर पैसे येत असल्यामुळे कुणाला नकोय या जगात सगळे पैसे कमवायलाच निघाले आणि त्यातल्या त्यात सरकार पैसे देतंय तेही मदत म्हणून, मग कोण का घेणार नाही. मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी खात्यावर येत आहे. असा महिलांना वाटू लागलेला आहे. आणि ते वाटण स्वभाविक आहे. कारण आता पर्यंत 7500 रुपये महिलांच्या खात्यावर येऊन पडले आहे.