सिन्नर मध्ये इच्छुक उमेदवारांची रांग … नेमकी उमेदवारी कोणाला …!!
सिन्नर विधानसभा मतदारसंघ - उमेदवार कोण .. ?

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर.दि. १८ ऑक्टोबर – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता नुकतीच जाहीर करण्यात आली असून सर्वत्र निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असल्याचे सिन्नर चे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे महिला कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जाऊन प्रतेक घराघरात ” लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी होत आहे का , या योजनेचे पैसे भेटतात का… काही अडचण आल्यास आम्हाला कळवा.. असे आवाहन केले जात आहे व संबंधित रहिवासी असलेल्या मुख्य व्यक्ती चा फोटो काढून तो ऑनलाईन पाठवून कामाचं लोकेशन कळवुन आ. माणिकराव कोकाटे यांच्या फोटो असलेले व त्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह असलेल्या पोस्टर वाटप करण्यात येत आहे. आमदार कोकाटे यांनी एक प्रकारे प्रचाराचे काम सुरू केले आहे असं गावात गावात चर्चा आहे.परतुं संबंधित कार्यकर्ते निवडणूकी संदर्भात काही न बोलता फक्त योजनां बाबतीत सविस्तर माहिती घेत आहेत. तसेच कुठल्याही पक्षाचा व उमेदवारांचा व्यक्तिशः प्रचार करत नाही हे पण लक्षात घेवा लागेल.
सिन्नर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. आ.कोकाटे यांच्या विरोधात शिवसेनेचा ( उद्धव ठाकरे गट ) इच्छुक असलेल्या उमेदवार कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील गावपातळीवर संपर्क वाढला आहे व तसेच राजेश गडाख यांनी सुद्धा आपण इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. इच्छुक उमेदवारांची यादी वाढतच चालली असून या मतविभागणी चा कोणाला फायदा होईल व कोणाला तोटा होईल हे येणारा काळच ठरवेल.
जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी अनेक दिवसांपासून कंबर कसली असून वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक व वयक्तीत लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर याच पक्षाचे नेते उदय सांगळे बंड करून शरद पवार यांच्या गटात जाऊन आमदारकीसाठी आग्रही असल्याचे दिसून येते आहे. तर दुसरीकडे स्वराज्य पक्ष तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेत आपणं स्वतंत्र लढवणार आहेत.त्यामुळे सिन्नर च्या उमेदवारांमध्ये आणखीन एक उमेदवारांची भर पडली असुन जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे अशी माहिती जाधव यांनी वेगवान शी बोलताना दिली. मनसे तर्फे आणखीन रामदास तात्या खरणार यांच्या ही नावाची चर्चा आहे तर शरद पवार यांच्या गटातर्फे राजाभाऊ मुरकुटे यांनी उमेदवारी करण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आणि गद्दारनां थारा नाही या उद्धव ठाकरे यांनी या पुर्वीच जाहीर केले आहे.. या सर्व गोष्टी लक्षात घेता उदय सांगळे यांची चांगलीच गोची झाली असून ते सध्या आपल्या समाजसेवा व कामांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधताना दिसत आहे. विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी मात्र निवडणूक लढवणार… आणि … … ! !
या अनुषंगाने श्री कोकाटे हे कोण काय करणार अन् कोण उभं राहणार याकडे लक्ष न देता सरकारी योजना लोकांना माहिती देताना राष्ट्रवादी पक्षाचे काम व ओळख करून दिली जात असताना दिसत आहे.
