नाशिक जिल्ह्यात पकडला ट्रक भर गुटखा

वेगवान नाशिक/सागर मोर
वणी – गुजरात राज्यातुन महाराष्ट्र राज्यात होणारी गुटख्याची अवैध वाहतुक वारंवार उघडकीस येत असुन विशेष पोलिस महानिरीक्षक व वणी पोलिस यांच्या संयुक्त विशेष पथकाने पांडणे टोलनाक्याजवळ अवैध गुटखा वाहतुक करणारे आयशर वाहन पकडले असुन पाच संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांना अटक करण्यात आली आहे.तर तिघे फरार आहेत
वणी पोलिसांनी दिलेली माहीती अशी ,गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथुन महाराष्ट्रात अवैध गुटख्याची वाहतुक आर्थिक फायद्यासाठी होत असल्याची माहीती मिळाली.विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व वणी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने वणी सापुतारा या राष्ट्रीय महामार्गावर पांडाणे टोलनाक्याजवळ सापळा लावला असता MH 15 -JC- 5522 हा आयशर ट्रक पांडाणे टोलनाक्याजवळ गुजरात राज्यातुन आला असता संशयावारुन संयुक्त पथकाने तो अडविला.
ट्रकमधे शेतीचे कॕरेट दिसले मात्र संशय बळावल्याने त्या कॕरेटच्या मागे संशयास्पद सफेद व हिरव्या रंगाच्या प्लॕस्टीकच्या गोण्या आढळुन आल्या.त्याची तपासणी केली असता एकुण 30 सफेद रंगाच्या प्लास्टीकच्या मोठ्या गोण्या त्यापैकी प्रत्येकी एका मोठ्या गोणीमधे 5 सफेद रंगाच्या प्लास्टीकच्या छोट्या गोण्या त्यात 15,600 हिरा पान मसाल्याचे पाकिटे,किम्मत 18,लाख 72 हजार ,हिरव्या रंगाच्या प्लास्टीक गोण्यामधे राॕयल 717 तंबाखु किम्मत रुपये 4 लाख 68 ,हजार यात उत्पादकांच्या नावांचाही समावेश आहे, मोबाईल फोन व प्लास्टीकचे रिकामे कॕरेट किम्मत 20 हजार रुपये व वाहन असा एकुण 43,लाख 65 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे
गुटख्याची तस्करी करणारे शौकत चांद शेख रा.न्यु टिलक रोड,वाडीया पार्कसमोर,अहिल्यानगर ,ता.जिल्हा अहिल्यानगर ,शेख जमील जब्बार रा.शेवगाव ,नाईकवाडी ,मोहल्ला ,ता शेवगाव ,जिल्हा अहिल्यानगर,रिजवान भाई रा.श्रीरामपुर, अहिल्यानगर ,यांचे मार्फत गुजरात राज्यातील सुरत शहराजवळ असलेल्या उनपाटीया पुरवठादार व्यापारी नामे मदनी चाचा रा.सुरत ,गुजरात ,मयुर एजन्सी,साहील मार्केट, मेन रोड सुरत ,व शोएब (पुर्ण नाव नाही ) अशा पाच तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पैकी दोघांना अटक करण्यात आली आहे तर उर्वरीत तीन फरार संशयीत यांचा शोध पोलिस घेत आहेत
विशेषण पोलिस महानीरीक्षक सपोनी सुनिल पाटील ,पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे ,निलेश सावकार ,लक्ष्मण वायकंडे व विशेष पोलिस महानिरीक्षक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भिसे ,विजय बिलघे ,प्रमोद मंडलीक ,स्वप्नील माळी ,मिलिंद पाटील यांनी ही मोहीम संयुक्तरीत्या राबविली.अधिक तपास सपोनी सुनिल पाटील करत आहेत.
