
वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक 18 ऑक्टोबर /परतीच्या पावसाने आज सायंकाळी नाशिक जिल्ह्यात पूर्व भागात मध्ये विजेच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.
दरम्यान पावसा बरोबर वाऱ्याचा जोर एवढा होता की कांदा पीक कांदा रोपे, मका पीक भुईसपाट झाले आहे येवला तालुक्यातील पूर्व भागात अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे
येवला तालुक्यातील पूर्व भाग परिसरात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेती पिकांना मोठा फटका बसला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
आता कापशी ता. देवळा येथे व परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. संपूर्ण कांदा पीक व मका पिकाचे नुकसान 100 टक्के झालेले आहे
सर्व शेतकऱ्यांनी आतापासून 14447 यानंबर वर फोन करून पीकविमा नुकसानभरपाई साठी तक्रार दाखल करा.
आधी क्रॉप लॉस तक्रार दिलेली असेल तरी परत द्या आणि सर्वांनी द्या.
उद्याच शासकीय पंचनामे व्हावेत याकरिता सर्वांनी आपल्या गावातील सरपंच यांना भेटून ग्रामपंचायत अधिकारी असतील किंवा तलाठी अधिकारी आणि कृषी सेवक अधिकारी यांना बोलावून घ्यावे
आणि याआधीच प्रत्येक तहसीलदार यांनी आदेश दिलेले आहेत पंचनामे सुरु करा.
जयदीप भदाणे
नाशिक जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये