लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकार तर शेतक-यांसाठी केंद्र सरकारचा मोठा प्रसाद
लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकार तर शेतक-यांसाठी केंद्र सरकारचा मोठा प्रसाद
वेगवान मराठी
नवी दिल्ली, ता. 17 – आॅक्टोबर 2024- सध्या लाडकी बहीण आणि भारतातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना दिवाळीमध्ये महाराष्ट्र सरकारकडून बोनस दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. तर निवडक महिला आणि मुलींना पंचवीस रुपये आणि त्याचबरोबर मोबाईलही भेट दिला जाणार असल्याचं माहिती समोर येते. त्याचबरोबर आता अनेक महिलांना दिवाळीच्या आधी पाच हजार पाचशे रुपयांचा बोनस दिला जाणार असल्याचं कळतयं. एवढं होत असतांना मोदी सरकारने भारतातील शेतक-यांना एक प्रसाद म्हणजे दिवाळी भेट दिली आहे. ती म्हणजे शेती मालाला वाढून हमीभाव मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात निर्णय घेण्यात आला. हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असल्याच बोलला जात आहे.
केंद्र सरकारने अजून एक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील जे पीक होते त्या पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे आता शेतकऱ्यांची जी पीक आहे याचा हमीभाव वाढवून मिळणार आहे.
केंद्र सरकारने यामध्ये जवळजवळ कोणत्या कोणत्या पिकांचा हमीभाव वाढवून घेतलाय ते जाणून घेऊया, सरकारने 2025 ते 26 या वर्षासाठी एम एस पी निश्चित केली आहे.या निर्णयानुसार गव्हाच्या किमतीमध्ये प्रत्येक दीडशे रुपयांनी वाढ होऊन ती 2425 रुपये इतकी झालेली आहे. आतापर्यंत गहू 2275 पर्यंत होता. मोहरी वरील एम एस पी 300 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वाढवली आहे. त्यामुळे आता मोहरी ५९५० रुपयांना विक्री होणार आहे. याआधी 5600 पन्नास रुपये प्रति क्विंटल मोहरी विकत होती. केंद्र सरकारने हरभऱ्याची किंमत सुद्धा वाढवलेली आहे. यामध्ये प्रतिक्विंटल 210 रुपये एमएसपी मिळणार आहे .आणि या हरभऱ्याची किंमत आता पाच हजार सहाशे होणार आहे. याआधी हरभरा 5400 रुपये क्विंटल दर होता.
मसूरीवरील एमएसपी ही प्रति क्विंटल 275 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मसुरीचा दर हा 6425 रुपयांवरुन 6700 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.