मोठी बातमीःचांदवडचे विद्यामान आमदार राहुल आहेर यांची माघार भाजपातर्फे केदा आहेर रिंगणात
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
चांदवड, ता. चांदवड विधानसभा मतदारसंघासाठी ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी म्हणावी लागेल, कारण विद्यमान भाजपाचे आमदार राहुल आहेर हे दोन वेळा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य राहिलेले आहे. मात्र होणा -या आगामी निवडणुकीमध्ये केदा आहेर यांनी मोठ्या प्रमाणात रणशिंग फुंकल्यामुळे केदा आहेर यांचा जोर व आक्रमता बघता, या दोन कुटुंबांमध्ये आपआपसात मध्यस्थी होऊन विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी माघार घेत भाजपातर्फे केला केदाआहेर यांना उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केल्याची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे.
चांदवड देवळा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राहुल आहेर यांची पत्रकार परिषद!
राहुल आहेर यांनी पक्षाला केदा आहेराना उमेदवारी देण्याची केली वरिष्ठांकडे मागणी.
वेगवान ला काय वाटतयं
आमदार राहुल आहेर यांची विधानसभा निवडणूक रिंगणातून माघार! हे स्पष्ट झाले असले तरी वेगवान मीडिया याबाबत आपलं मत मांडत आहे.
चांदवडचे विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी चांदवड येथे पत्रकार परिषद घेऊन आपला मुद्दा जो आहे तो पत्रकारां समोर मांडलेला आहे. यामध्ये त्यांनी केदा आहेरांसाठी मी माघार घेत आहे.
मी पक्षश्रेष्ठींकडे त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून मागणी करणार आहे. असे सांगितले आहे. मात्र राहुल आहेर यांची मागणी पक्षश्रेष्ठ मान्य करतील का?
कारण राहुल आहेर हे दोनदा चांदवडचे आमदार राहिले आहे. आणि ते तिस-या विधानसभेसाठी इच्छुक असतांना ते अचानक माघार घेत आहे. केदानाना व आमदार राहुल आहेर हे भावबंदकीमुळे माघार घेत असेलही हे आम्ही मान्य करतो.
केदा आहेर यांना या निमित्ताने संधी मिळणार याबाबत शंकाच नाही. मात्र राहुल आहेर हे दोन वेळा चांदवडचे आमदार झाले आहे. मात्र भाजपा हे कसं मान्य करु शकतं. कारण विद्यामान आमदारला डावलून भाजपाच्या पदाधिका-याला कसं उमेदवारी दिली जाईल हा कोड्यात टाकणार सवाल आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे तो सब कुछ मुमकीन है..मात्र देवेंद्र फडणवीस आहे बर या सर्व राजकारणामागे…
कदाचीत ही मतदार संघाची व देवळा तसेच चांदवड तालुक्यातील जनतेला माहिती मिळावी म्हणून तर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले नाही. आणि खरोखर राहुल आहेर यांची माघार जरी होत असेल पण भाजपा पक्ष हे मान्य करील का की विद्यामान आमदाराला डावलून उमेदवारी देणे….आणि नाही केलं तर शेवटी राहुल आहेर हेच भाजपाचे पुढील उमदेवार असतील यात शंका नाही. मात्र जर शेवटी निर्णय केदा आहेर यांच्या बाजूने झाला तर राजकारणात राहुल आहेर यांची भूमिका मोठ्या मनाची होईल यात शंका नाही.
कारण देवळा मधून दोन उमदेवार उभे राहणे हे दोघांचा पराभव करणारे आहे. हे केदा आहेर व राहुल आहेर या दोघांना पण माहित आहे. मात्र चांदवड मधून मतविभाजन निश्चित आहे. देवळ्यातून एकचं व्यक्ती उमेदवारी करणार यात शंका नाही मग राहुल आहेर असो की केदा आहेर…