अरे वा.. या मार्गावर धावणार नवीन सुपरफास्ट रेल्वे, आठवड्यातून किती दिवस धावणार
लोकमान्य टिळक टर्मिनस ते गया दरम्यान नवीन रेल्वे सेवा
वेगवान नाशिक
नाशिक, ता. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते गया दरम्यान नवीन रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:- ही रेल्वे किती दिवस धावणार आहे. कोणते स्टेशन घेणार आहे.
ट्रेन क्रमांक २२३५७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते गया साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दिनांक २५.१०.२०२४ पासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी गया येथे २२.५० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक २२३५८ गया ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दिनांक २३.१०.२०२४ पासून दर बुधवारी गया येथून १९:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०५:५० वाजता पोहोचेल.
थांबा -: कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, हटिया, रांची, मेरसा, बरकाकाना, हजारीबाग टाउन आणि कोडरमा.
संरचना : ०१ प्रथम वातानुकूलित, ०२ द्वितीय वातानुकूलित, ०३ तृतीय वातानुकूलित (इकॉनॉमी क्लास) , ०३ तृतीय वातानुकूलित, ०६ शयनयान, ०४ सामान्य द्वितीय श्रेणी, ०१ पँट्रीकार, ०१ जनरेटर व्हॅन, ०१ एसएलआर एकूण २२ एलएचबी कोच.
आरक्षण: ट्रेन क्रमांक २२३५७ साठी बुकिंग दि. १९.१०.२०२४ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते गया दरम्यान नवीन रेल्वे सेवा