नाशिकचे राजकारण

नांदगाव मध्ये रंगणार असा खेळ, समीर भुजबळांना का मिळाले बळ


वेगवान नाशिक / मुक्ताराम बागुल

नांदगाव , ता. 16 – विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र व नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ यांची नियुक्ती झाल्याने पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर पंकज भुजबळ यांचे विधिमंडळात पुनारागमन होणार आहे,Such a game will be played in Nandgaon, why did Sameer Bhujbal get strength

पंकज भुजबळ विधान परिषदेवर गेल्याने नांदगाव मतदार संघातून आता माझी खासदार समीर भुजबळ यांची दावेदारी आणखी प्रबळ झाली असून महायुतीत आता जागा वाटपावरून घमासन होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी सन 2009 मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पहिल्यांदा उमेदवारी केली आणि शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला.

या निवडणुकीमध्ये पंकज भुजबळ यांनी 53.33 टक्के मध्ये घेतली होती. तर संजय पवार यांच्या मतांची टक्केवारी 41.49 टक्के होती.सन 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडुन पुन्हा पंकज भुजबळ यांनी उमेदवारी केली. यावेळी भुजबळ यांच्यासमोर शिवसेनेचे सुहास कांदे व भाजपकडून अद्वय हिरे यांनी आव्हान दिले होते.

या निवडणुकीमध्ये पंकज भुजबळ यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. परंतु मत विभागणीमुळे त्यांच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली. पंकज भुजबळ यांना 34.45 टक्के मते मिळाली. तर सुहास कांदे व अद्वैरी यांच्या मतांची टक्केवारी 25% च्या आसपास होती. दोन टर्म आमदार राहिलेले पंकज भुजबळ हे 2019 च्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मतदारांना सामोरे गेले. परंतु या निवडणुकीत शिवसेनेचे सुहास कांदे यांनी पंकज भुजबळांचा पराभव केला.

दरम्यान नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाल्याने माजी खासदार समीर भुजबळ यांची नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी दावेदारी प्रबळ मानली जात आहे. मात्र महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेचे सुहास कांदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यापैकी कोणाला तिकीट मिळते हे पाहणे गरजेचे आहे.

मात्र समीर भुजबळ यांच्या भुजामध्ये का बळ आले त्याचे कारण म्हणजे या मतदार संघावर भुजबळ परिवाराचा डोळा आहे. कारण याच मतदार संघात पंकज भुजबळ हे आमदार राहिले आहे. आणि ती जागा भुजबळ परिवार सोडू शकतं नाही. त्यामुळे येणा-या निवडणूक असं चित्र पण नांदगाव व नाशिक जिल्ह्याला पाहण्यास मिळू शकते ते म्हणजे जर समीर भुजबळ निवडून आले तर राष्ट्रवादी अजीत पवार गटाचा आमदार वाढेल आणि  पडेल तर शिंदे गटाचा आमदार म्हणजे सुहास कांदे यांच्यामुळे शिंदे गटाची जागा फिक्स राहिलं. मात्र आता जागा तर शिवसेनेसाठी सुटणार आहे. त्यामुळे समीर भुजबळ बंड करुन या जागेसाठी लढणार यात शंका नाही. भुजबळ पण नंतर म्हणतील की पुतण्या माझं ऐकतं नाही. त्यामुळे कांदे विरुध भुजबळ हा सामना रंगाणार या शंकाचं नाही.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!