नाशिक क्राईम

मोठी बातमीः नाशिकमध्ये लग्न प्रकरणामुळे एकाला जन्मठेप

मोठी बातमीः नाशिकमध्ये लग्न प्रकरणामुळे एकाला जन्मठेप


वेगवान नाशिक 

नाशिक: २०१३ मध्ये नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने आपली आंतरजातीय विवाह केलेली गर्भावती मुलगी प्रमिला हिचा गळा दाबून खून केला होता.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यामागचा शोध घेऊन त्या खुनामाघे जातपंचायत चा हात असल्याचे शोधुन काढले होते.तेव्हापासून जातपंचायतचे दाहक वास्तव प्रथमच समाजासमोर आले होते.

प्रमिलाचे बलिदान व्यर्थ गेले नाही कारण तिच्या खुनानंतर २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकाराने जातपंचायतच्या मनमानी विरोधात कायदा केला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आरोपी यास नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने ती कायम केली. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. महाराष्ट्र अंनिस या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.

” सदर ऑनर किलींग नंतर नाशिक येथील पुरोगामी संघटनांनी निषेध मोर्चा काढला होता. अंनिसने जातपंचायतचा लढा त्यामुळेच सुरु केला.ह्या शिक्षेमुळे जातपंचायती व ऑनर किलींग यांना आळा बसेल. पुन्हा असे प्रकार होणार नाही,यासाठी वचक बसेल”
-कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!