नाशिक जिल्हा बॅंक NDCC आता वा-यावर… मंत्रीमंडळात
नाशिक जिल्हा बॅंक आता वा-यावरची वरता ठरली की काय, एवढ्या लोकांच्या पैशाची गुंतवणूक वाया जाणार की काय अशी स्थिती निर्माण झालीयं

वेगवान नाशिक
नाशिक .ता. 15 नाशिक जिल्हा बँक NDCC वाचवण्यासाठी 715 कोटी रुपये भाग भांडवलामध्ये गुंतवणूक करण्याचा आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिला होतं.
मात्र आचारसंहितेपूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी याबाबत निर्णय झाला नाही. यामुळे 12 लाख ठेवीदार व हजारो शेतकरी वंचित राहिले आहेत.
मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीकडे बँक प्रशासनासह शेतकरी व सभासदांचे लक्ष लागून होतं. पुणे येथे साखर संकुलनात दोन महिन्यापूर्वी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत आढावा बैठक झाली होती.
या बैठक प्रामुख्याने अडचणीत सापडलेल्या नाशिकच्या बँकेबाबत सखोल चर्चा झाली होती. बँकेला आरबीआयच्या नोटीसा प्राप्त झाल्या आहेत. त्या दृष्टीने या बँकेची स्थिती सुधारण्यासाठी वेगळी योजना राबवण्याबाबत शासन स्तरावर विचार विनिमय सुरू होता.
जिल्हा बँक आणि जिल्हा विकास सोसायटी आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करावेत, शासनामार्फत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत शासन आग्रही व सकारात्मक असल्याचा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीचं म्हटले होते. त्यामुळे आर्थिक मदतीचा चेंडू शासनाचे दरबारी होता, मात्र आचारसंहिता लागू लागल्यापूर्वी याबाबत निर्णय झाला नाही.
नाशिक जिल्हा बँक संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये झाडापासून आहे मात्र गेल्या कोरोना काळापासून जिल्हा बँक ढबगायला आले ची स्थिती आहे कारण जिल्हा बँकेकडे ग्राहक फिरकायला तयार नाही आणि ज्या लोकांचे पैसे या जिल्हा बँक मध्ये अडकून पडले ते निघायला तयार नाही बँक या वेळच्या मधून बाहेर येत नाहीये त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या ग्राहकांची तसेच हजारो शेतकऱ्यांची आता आशा निराशात बदलत चाललेली आहे.
पैशाच्या हिशोबाचे उत्तर आरबीआय जिल्हा बँकेकडे मागते त्यामुळे आरबीआय कडून नोटीसावर नोटीसा येत आहे मात्र जिल्हा बँक ला यातून सावरता येत नाहीये जिल्हा बँकेला सावरता यावर यासाठी महाराष्ट्र सरकारकडे हा प्रश्न गेला होता विधानसभा लागण्याच्या अगोदर विद्यमान मंत्रिमंडळ तरी याच्यावर निर्णय घेईल अशी अपेक्षा होती मात्र आता ही अपेक्षा फोन ठरली आहे कारण आता विधानसभेची घोषणा होणार आहे त्यामुळे जिल्हा बँक आता वाऱ्यावरचं राहिली आहे
