महाराष्ट्रातील अनेक जिल्हांमध्ये अतिृवष्टी, पावसाने बाकी मनावर घेतलं
महाराष्ट्रातील अनेक जिल्हांमध्ये अतिृवष्टी, पावसाने बाकी मनावर घेतलं In many districts of Maharashtra, heavy rains took over

वेगवान नाशिक / धिरेंद कुलकर्णी
नागपूर, ता. Maharashtra, heavy rains मान्सून परत जायला निघाला आहे, मात्र जाता जाता महाराष्ट्राला ठोकून चाललाय. महाराष्ट्रानं 100% च्या पुढे पावसाने सरासरी ओलांडली आहे. मात्र पावसाने पुन्हा मनावर घेतलेला दिसताय कारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पाहायला मिळाली आहे. धो-धो असा पाऊस पडत आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार झाल्यामुळे याचा महाराष्ट्रावर परिणाम होत आहे. कमी दाबाच्या क्षेत्र वायव्यकडे जाताना त्याची आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि तोही मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ च्या अंतर्गत येणाऱ्या चांदवड तालुका,देवळा तालुका,निफाड तालुका,दिंडोरी तालुका या क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसात अतिवृष्टी होऊन मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे पशुधनाचे व शेतीचे तसेच इतर वित्तहानी झाली. त्याचबरोबर काही ठिकाणी मनुष्य देखील वाहून गेल्याचे व मृत्युमुखी पडण्याच्या बातम्या या येऊ लागल्या, पाऊस पूर्णपणे अजून देखील थांबलेला नाही.
दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांसोबत फोनवर सविस्तर बोलून त्यांना आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये झालेल्या नुकसानीचे संपूर्ण माहिती दिली.
बुलडाणा जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. मलकापूर, नांदुरा तालुक्यांत अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. बुलडाणा, खामगाव, चिखली या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्यात मागील चार दिवसांत बऱ्याच भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. प्रामुख्याने मलकापूर तालुक्यात मागील २४ तासांत अतिवृष्टी झाली असून, ११७ मिलिमीटर एवढी विक्रमी पावसाची यंदाची सर्वाधिक नोंद झाली आहे. त्यातही जांभूळधाबा मंडलात सुमारे १६६ मिलिमीटर पाऊस झाला.
महाराष्ट्र आणि दक्षिण भारत या राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रुपांतर झाले आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.
हवामान विभागांना जे अपडेट दिलाय त्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे, पुणे आणि घाट परिसरात हवामान ढगाळ राहणार असून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान राहणार असून पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आलाय.
आज मुंबई सह रायगड ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व भागांना अर्लट देण्यात आलेला आहेत. महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळणार असल्यामुळे पिकाचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.
