मोठी बातमीःपुन्हा चक्रीवादळ-महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार
पुन्हा चक्रीवादळ आलं..महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार

वेगवान नाशिक / दिपक पांड्या
नवी दिल्ली ता. 1 4 आॅक्टोबर 2024- यंदा संपूर्ण भारतामध्ये मान्सूनच जोरदार अशी हजेरी लावलेली आहे. मान्सून ना असं काही तांडव केलाय, की महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे, देशामध्ये मान्सूनच्या प्रगतीचा प्रवास सुरू झाला असला तरी हवामान विभागाकडून एक मोठा अपडेट आलेलं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा काही घडामोडींना वेग आला आहे आणि यामुळे या कमी दाबाचा क्षेत्राचा रूपांतर चक्रीवादळ यामध्ये होणार असल्याचा हवामान विभागाने सांगितले.
भारतीय हवामान खात्याने (IMD) 10 राज्यांसाठी 16 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. पुढील काही दिवसांत देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या काही भागांतून पुढील दोन दिवसांत माघार घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये, विशेषतः दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भारतामध्ये मुसळधार पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
बंगालचा उपसागर पुन्हा एकदा वेगवान घडामोडींचा साक्षीदार आहे. सोमवारपर्यंत कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन चक्रीवादळात बदलू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी गृह आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य परिणामांसाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बापटला, प्रकाशम, नेल्लोर, कुर्नूल आणि नांद्यालसह अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव बंगालपासून बिहारपर्यंत जाणवेल.
नाशिक मध्ये अतिवृष्टी
नाशिक जिल्ह्यामध्ये काल दिनांक 13 ऑक्टोबर २०२४ संपूर्ण नाशिक जिल्ह्याला पावसाला झोडपून काढलं. काल दुपार पासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आज दिनांक 14 ऑक्टोबर 2024 सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडत होता. ढगांचा गडगडात आणि विजेंचा कडकडाट सह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.Weather department and Punjabrao Dakh have warned of heavy rain in Nashik district
नाशिक जिल्ह्यामध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे शेती पिकाच्या मोठ्या नुकसान झालेला आहे. यामुळे आता कांदा मका सोयाबीन हे पीक पावसामध्ये भिजल्याने त्याला अंकुर येऊन पिक खराब झालेला आहे.
काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतीतील जमीन वाहून गेली आहे. मालेगाव तालुक्यातल्या एरंडगाव परिसरामध्ये जोरदार असा पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचा मोठा नुकसान झाला आहे.
देवळा तालुक्यामध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे देवळा तालुक्यातील शेती पिकाची संपूर्ण वाट लागली आहे. त्वरित पंचनामे करून सदर शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.,
चांदवड तालुक्यामध्ये ढगांच्या गडगडाचा मुसळधार अशा पावसांना हजेरी लावली. चांदवड तालुक्यातील अनेक गावांना काल मुसळधार पावसाने झोडपले. रात्री ढगांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा तांडव पाहायला मिळालं.
हवामान विभाग आणि पंजाबराव ढग यांच्या अपडेट नुसार आज नाशिक सह इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांना एलो अलर्ट देण्यात आलेला आहे. याच बरोबर नाशिक, धुळे, ठाणे, पालघर, या जिल्ह्यांनाही आलो आहे तो देण्यात आलेला आहे
