नाशिक ग्रामीण

येवला शहराच्या खालुन जाणार हे पाणी

येवला शहराच्या खालुन जाणार हे पाणी


वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव

येवला,दि.१३ ऑक्टोबर :-येवला शहरातील स्वच्छतेसाठी विशेष पाठपुराव्यातून भुयारी गटार योजना मंजूर करण्यात आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी ही योजना अतिशय महत्वाची योजना असून या योजनेचे काम दर्जेदार स्वरूपात करण्यात यावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ८२.०५ कोटी निधीतून येवला शहर भुयारी गटार योजना साकारण्यात येत आहे. या योजनेचे भूमिपूजन आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, राजेंद्र लोणारी, किसनकाका धनगे, मच्छिंद्र थोरात, राजेश भांडगे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, राजश्री पहिलवान, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, अविनाश कुक्कर, प्रवीण पहिलवान, पी.एल.आडके, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, माजी नगराध्यक्ष निलेश पटेल यांच्या कार्यकाळात आपण या योजनेला मंजुरी मिळविली होती. योजनेचे कामही सुरू झाले होते. मात्र सरकार बदलल्याने योजना बंद पडली. शेवटी कोर्टाच्या माध्यमातून पाठपुरावा करून ही योजना पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर सततचा पाठपुरावा करत येवला शहर भुयारी गटार योजनेच्या ८२.०५ कोटींच्या आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर आज या कामाचा शुभारंभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

येवला मतदारसंघात कुठलेही बेकायदेशीर काम होणार नाही यासाठी आपला प्रयत्न असतो. मात्र काही लोकप्रतिनिधी निधी नसताना देखील हजार कोटींची कामे मंजूर केल्याची बतावणी करतात. ती कामे होत नाही. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. येवला शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी येसगाव साठवण तलावातून जुनी पाणी पुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आपले प्रयत्न आहे.मात्र काही लोक अडथळा आणून अव्यवहार्य प्रकल्प करण्यासाठी अट्टाहास करत असल्याची टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, येवला मतदारसंघात धुळगावसह १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजना यासह जलजीवन मिशन अंतर्गत अनेक योजनांची कामे अंतिम टप्प्यात असून येवला मतदारसंघात प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल असे त्यांनी सांगितले.

*मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय आयटीआयचे नामकरण*

येवला बाभूळगाव येथील शासकीय आयटीआयचे महात्मा ज्योतिबा फुले शासकीय आयटीआय असे नामकरण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्राचार्य वाय.के.कुलकर्णी, स्थानिक प्राचार्य आर.एस.राजपूत, गटनिधेशक आर.के.आहेर, डी.एल.मगर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!