नाशिक ग्रामीण

दिवसा पाहुन घेतात आणि रात्री येऊन तुमचा कार्यक्रम करतात, तेही कडी लावून NASHIK

दिवसा पाहुन घेतात आणि रात्री येऊन तुमचा कार्यक्रम करता, तेही कडी लावून


वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव 

नाशिक, ता. 13 NASHIK  NEWS आता नाशिक जिल्ह्यात कहरच झाला आहे, ते दिवसभर फिरुन तुमच्यावर लक्ष ठेवत असतात. आणि बरोबर रात्री येऊन तुमचा  कार्यक्रम करतात.  नाशिक जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ सुरु आहे ते कोणताच तालुका सोडायला तयार नाही, जिल्ह्यात अनेक तालुक्यात शेतीचे विज पंप, शेतात असलेले स्पिनक्रल, पाईप, सोलर पंप, वायर यावर अनेक तालुक्यात चोरांनी डाव साधला आहे.They visit during the day and come and do your program at night, that too with a ring

जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते रात्री येऊन ते प्रथम कडी लावून आपला कार्यभाग साधतात.  तुम्ही मात्र झोपेत राहतात आणि ते येऊन तुम्हाला चुना लावून निघून जाातात.

आपण जर नाशिक जिल्ह्यातील राहणारे असला आणि आपण नाशिक शहर अथवा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी राहत असु द्या, ते दिवसभर बाईकवर फिरतात.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

तुमचे घर, दार, दुकान,  कार, मोटरसायकल, स्पोर्ट्स सायकल, तसेच ट्रॅक्टर, ट्रॅक पाहुन घेतात. तुम्ही रात्री बेसावध असतांना या चोरट्यांचा मोर्चा मात्र आपल्या घरावर वळतो आणि ते अति हुशारीने घरात घुसतात.

अनेक ठिकाणी हे चोरटे कडी लावून घेतात आणि मग चोरी करत असल्याचे समोर आले आहे. तुम्ही जर तुमच्या घरापुढे किंवा घरामध्ये अथवा दुकानमध्ये जास्त मुद्देमाल ठेवला असेल तर तो लंपास होईल कारण त्यांनी तुमच्यावर पाळत ठेवली आहे.

तुमच्यावर दोन तीन दिवस लक्ष ठेवून हे भामटे तुमचा अचुक कार्यक्रम लावतांना दिसून आले आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र या चोरट्यांचा कहरचं झाला आहे. कधी दिवसा ढवळ्या तुम्हाला गंडवून निघुन जातात तर कधी रात्री येऊन तुम्हाला लुटून नेतात.

नाशिक शहामध्ये याचे प्रमाण काही कमी नाही. त्यामध्ये ग्रामीण भागा सुध्दा मागे नाही. ग्रामीण भागातील देवळ्यामधून चक्क कांद्याचा ट्रॅलीसह भरलेला ट्रॅक्टर चोरांनी पळवून नेला, तर नांदगाव मधून थेट  भल्ला मोठा ट्रकचं गायब केला. एवढंचं नाही तर ते तुमच्या सौर उर्जालचे सोलर पॅनल सुध्दा पळवून नेत आहे.

नुकतेच येवला तालुक्यात अंदरसुल येथे मध्यरात्रीच्या सुमारास माऊली मोबाईल शॉपी व गुरुकृपा स्वीट मध्ये धाडसी चोरी मोबाईल शॉपीतील लाखोचा माल लंपास चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला हा  चोरटा डोक्यात मध्ये प्लास्टिक पिशव अथवा गोणपट घालून येते. ज्यामुळे त्याचा डोक्याखालाचा भाग व हालचाली सुध्दा लक्षात येत नाही.

पोलीसांना शोधणे कठीण  होण्यासाठी आता यांनी ही नवीन शक्कल लढविली आहे. अंदरसुल येथे छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पागिरे कॉम्प्लेक्स मधील माऊली मोबाईल शॉपी व गुरुकृपा स्विटस या दोन दुकानांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करत मोबाईल शॉपीतील सेकंड मोबाइल रोख रक्कम व बर्ड फोन व गुरुकृपा स्विटस मधून रोख रक्कम असा अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याने अंदरसुल गावात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक शहर व जिल्ह्यात चोरीचे प्रमाणा वाढल्यामुळे आता तुम्ही सुरक्षीत नाही मात्र निश्चित झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!