ब्रेकींगः मान्सूचा मुक्काम वाढला…आता ढगफुटीचा पाऊस
मान्सूचा मुक्काम वाढला...आता ढगफुटीचा पाऊस
वेगवान नाशिक
मुंबई, ता. 14 – महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचा दररोज अपडेट म्हणजे हवामान आहे. हवामान म्हणजे पाऊस कधी थांबणार आणि आम्ही शेतीतले कामे कधी करणार असाच एक विचार महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घोंगावत आहे.Monsoon’s stay extended…now cloudburst rain
मान्सून आता एक नवी बातमी घेऊन आला आहे ती म्हणजे परतीच्या पावसाला महाराष्ट्रातून मान्सूनला अजून पर्यंत सुरुवात झालेली नाही. मान्सूनचा परतीला लागला होता मात्र पावसाने पुन्हा मनावर घेतला आहे आणि आपला मुक्काम जो आहे तो लांबविला आहे.
फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारताच्या अनेक राज्यांमध्ये पाऊस झोडपणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना पाऊस जोडपून काढणार आहे.
आकाशातले आपण ढगांची तीव्रता जर बघितली तर मोठ्या प्रमाणात आकाशामध्ये ढग येत आ.हे आणि या ढगांचा स्वरूप असा आहे की ढग फुटी सदस्य पाऊस होईल, अशाच पद्धतीचा हे वातावरण सध्या महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून आपल्याला पाहायला मिळतं.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ढगांच्या वातावरणामध्ये एक प्रकारे राकट स्वरूप धारण झालेला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी संपूर्ण पाऊस जर पडला तर त्याला ढगफुटीचा पाऊस म्हटला जातो, ढगफुटीचा पाऊस हा एकाच ठिकाणी संपूर्ण ढग पडून रिकामे होते. त्यामुळे त्या पावसाची कल्पना न केलेली बरी असते.
शेवटी हा निसर्ग आहे. सगळे बदल हे त्याच्या हातात असतात निसर्गाला कोणी मालक नाही. त्यामुळे हवामान अंदाज हे फक्त यंत्रणेवरून दिले जातात. मात्र निसर्गामध्ये अचानक बदल होतो हे नाकारता येत नाही. हवाामान विभागाने महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे.
एवढेच नाही तर स्कायमेटच्या वेदर नुसार कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, आणि लक्षद्वीप मध्ये हलक्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचाही माहिती समोर आली आहे, आणि महाराष्ट्रसह आंद्र प्रदेश आणि दक्षिण मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.
दोन चक्रीय वा-याच्या स्थितीमुळे जोरदार पाऊस
महाराष्ट्र मध्ये सध्या सोयाबीन व मका हे दोन मुख्य पीक कापणीसाठी आलेले आहे. आणि याची कापणी जर उशिरा झाली तर याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसणार आहे. सध्या मकाला 2700 रुपये पर्यंत भाव मिळतोय आणि सोयाबीन 43 रुपये भावाने विकले जाते. जर हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला तर शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे.
आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे आज ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.