ढग फुटल्याने पाणी पाणी, गडगडाट व कडकडाटासह पावसाचा कहर
ढग फुटल्याने पाणी पाणी, गडगडाट व कडकडाटासह पावसाचा कहर
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
नाशिक, ता.14 जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोयाबिन, कांदा, कांदा रोपे,मका सह अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. अगोदरच पावसाने हाहाकार केलेला असताना विजेच्या कडकडाटासह सुरू झाला आहे.
जिल्ह्यातील निफाड,दिंडोरी, कळवण, सिन्नर पिंपळगाव( ब )मनमाड, विंचूर चांदवड, येवला देवळाआदी तालुका व परिसरातील काही भागात मध्ये ओढेनाले एक झाले.
जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. काढणीस आलेली अनेक पिके भिजून गेली. पावसाळा सुरू झाल्यापासून या परिसरात सातत्याने पाऊस सुरू आहे. काढून ठेवलेल्या अनेक शेतकर्यांच्या पिकांमध्ये मध्ये पाणीच पाणी झाले आहेत.
पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. सत्तर वर्षात असा मोठा पाऊस झाला नसल्याचे अनेक जुने जाणकार सांगतात.
जिल्ह्यात शासनाने अतिवृष्टी जाहीर करून सरसकट शेतकर्यांना मदत देणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी छोटे मोठे बंधारे फुल्ल झाले आहे, जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदीला पूर आलेला आहे.सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सर्व नागरिकांना आणि संबंधित शासकीय यंत्रणांना कळविण्यात येते की,आज दि.13/10/2024 रोजी ओझरखेड धरण व पुणेगाव धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस जोरात पडला असून दोन्ही धरणे शंभर टक्के भरल्याने ओव्हरफ्लो चे पाणी ऊनंदा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
अजून असाच पाऊस पडत राहिल्यास नदीतील पाण्याची पातळी वाढू शकते.तरी पुनेगाव धरणाखालील व ओझरखेड धरणाखालील नदीकाठच्या ओझरखेड, राजापूर,आंबेवणी , वरखेडा या गावाच्या नागरीकांना आवाहन करण्यात येते की नदीप्रवाहात कोणीही जावू नये.
नदीकाठ लगतचे आपले पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.
संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी.
उपविभागीय अभियंता,
ओझरखेड कालवा उपविभाग क्रं .2,पिंपळगाव (ब).
आज संध्याकाळी झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी व शेतीचे नुकसान झालेले आहे.
तरी संबंधित सर्व यंत्रणेला तसेच तहसीलदार कार्यालय देवळा व चांदवड यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.आ . डॉ. राहुल दौलतराव आहेर
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये