सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे अजितदादांना सोडुन जाणार !
सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे अजितदादांना सोडुन जाणार....
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर. दि, 2 ऑक्टोबर — कोणी कुठंही जाऊद्या मी दादांची साथ कधीच सोडणार नाही.अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( अजित पवार गट ) व सिन्नर चे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. अजित पवार सिन्नर मधुन निवडणूक लढवणार असल्यास त्यांना “दीड लाख ” चं मताधिक्य मिळवून दिलं जाईल असे ठाम मत विद्यमान आमदार श्री.माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले . माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांना सोडून शरद पवार गटामध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यावर कोकाटे यांनी काय सांगितले ते पहा.
मी माझ्या मतदारसंघातच निवडणूक लढवणार आहे कारण तेथील जनतेला अजित दादा पुन्हा आमदार व्हावा यासाठी लोक आग्रही आहे. त्यामुळे मला त्यांचं ऐकावं लागेल. मी बारामतीत या पेक्षाही जास्त मताधिक्य मिळवून दाखविल असा आजच शब्द देतो. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री.कोकाटे यांच्या विधानावर आपलं मत मांडलं आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे शेतकरी मेळावा व विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार कोकाटे यांच्यां झालेल्या भाषणा दरम्यान सांगितले.
यावेळी आमदार माणिकराव कोकाटे यांचे अजित पवार यांनी विकास कामाबद्दल तोंडभरून कौतुक केले. मी प्रत्येक आमदारांना दोनशे कोटींची कामांचा प्रस्ताव सादर करण्यात सांगितले होते परंतु या तुमच्या आमदार माणिकराव कोकाटे यांनी तब्बल ९४० कोटींचा प्रस्ताव सादर केला व तो मंजूर करून घेतला. पहा या पठ्ठ्याने जवळपास पाच आमदारांचा निधी एका आमदाराने आणला.
येवडा जिद्दी व चिकाटी माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही. अशा कामांच्या माणसाला हि सिन्नर तालुक्यातील जनता मोठ्या मताधिक्य मिळवून देईल व पुन्हा आमदार म्हणून निवडून येतील असे ठाम विश्वासाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.