
वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड, नांदगाव,दि.12 ऑक्टोबर-
येत्या विधानसभेत आम्ही,आमचा पक्ष,आमचा उमेदवार,मीच जिंकणार अशी वल्गना जोरात सुरू आहे.
प्रस्थापित आजी-माजी आमदार, खासदार, उदयोन्मुख कार्यकर्ते प्रत्येकाने गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे.
या निवडणुकीत कित्येकांची प्रतिष्ठा पणाला लागणार. विशेषकरून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात ही निवडणुक अटीतटीच्या आवेशाने होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
त्यातच संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या शिवकालीन इतिहासानंतर चारशे वर्षांनी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास ठेवून एकजूट झालेला असताना शासन, प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधी राज्यकर्ते सातत्याने मराठा समाजाच्या ज्वलंत आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे,खिल्ली उडवीत आहे.
गेल्या 42 वर्षांपासून मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लढा देत असताना समाजाचे 400 च्या वर बळी गेले.तरीही राज्यकर्ते जाणून-बुजून हेतू पुरस्कर समाजाला दुष्ट हेतूने मोडीत काढण्याचे प्रयत्न करीत आहे.
या सर्व व्यवस्थेला आणि परिस्थितीला कंटाळून आणि जरांगे पाटलांच्या आदेशावरून नांदगाव 113 विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य आणि सर्व मान्य उमेदवार देण्याची चाचपणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.
याच दरम्यान तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांनी आग्रह धरल्यावरून नांदगाव तालुक्यात देव माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर रोहन बोरसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नांदगाव तालुक्यातील भ्रष्टाचार,निकृष्ट दर्जाची कामे, दहशत,जातीभेद,गुंडगिरी मोडीत काढून भयमुक्त,आनंदी आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करुन शाश्वत विकासासाठी नांदगाव तालुक्यात लोकसंख्येने नंबर एक असलेल्या मराठा समाजाच्या वतीने उमेदवार देण्याचे नियोजित असून लवकरच डॉक्टर रोहन बोरसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे अशी माहिती भास्कर विष्णु झाल्टे, मराठा आरक्षण उपोषणकर्ते तथा जिल्हा उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक ग्रामीण यांनी दिली.

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…