नाशिक आणि नगरला जोडणारा हा मार्ग होणार चकाचक
नाशिक आणि नगरला जोडणारा हा मार्ग होणार चकाचक
वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
नाशिक, दि.12 ऑक्टोबर 2024:- दळणवळणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे रस्ते आणि जर रस्ते व्यवस्थित नसेल तर प्रवासीच काय प्रत्येकाला रस्त्याने जावे -यावे लागते. मग तो बाईक स्वर असू द्या, अथवा बस मधून प्रवास करणारा प्रवासी, मात्र प्रत्येकाला रस्त्याने प्रवास करावाचं लागतो.
मात्र जर रस्ते चांगले नसतील तर याचा फार त्रास प्रवाशांना होतो. तुम्हाला अपडेट करणारी ही बातमी आहे. ती म्हणजे नाशिक आणि नगर जिल्ह्याला जोडणारा हा महामार्ग आता चकाचक होणार आहे. यामुळे नगर आणि नाशिकच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. कोणता हा रस्ता आहे, ज्यामुळे नाशिक आणि नगर शॅाटकट जाण्यासाठी हा रस्ता फायद्याचा ठरणार आहे.
नाशिक आणि नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी हा मार्ग शॅाट असणारा आहे. जर नाशिककरांना नगर जाण्यासाठी नाशिक चांदवड, मनमाड, वरुन नगरला जाता येते.
दुसरा महत्वाचा मार्ग म्हणजे नाशिक औरंगाबाद महामार्गवरुन येवल्यातून नगरला जाता येते. तसेच नाशिक सिन्नर वरुन वावी मार्गे नगर जाता येते. मात्र नाशिक मधील लासलगाव, येवला तालुक्यातील काही गावे, तसेच कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांना नाशिक जिल्ह्यात यायचे अथवा जायचे असेल तर एक शॅाट मार्ग म्हणजे कोळपेवाडी मार्गे थेट भरवस फाटा आहे.
आशियाई विकास बँक सहाय्यीत प्रकल्प “महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत” प्रमुख राज्य मार्ग २ भरवस फाटा ते कोपरगाव राज्य मार्ग ७ या ७६ कोटी ८० लाखांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी पद्धतीने करण्यात आले.
आशियाई विकास बँक सहाय्यीत प्रकल्प “महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत प्रमुख राज्य मार्ग २ भरवस फाटा ते कोपरगाव तालुका हद्द राज्य मार्ग ७ या ७६ कोटी ८० लाखांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या सोहळ्यास आभासी प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये