शेती

परतीच्या पावसाचा कांद्याला फटका, असं असेल कांद्याचे भविष्य

परतीच्या पावसाचा कांद्याला फटका, असं असेल कांद्याचे भविष्य


वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव

येवला /दिनांक /11 ऑक्टोंबर  2024/गेल्या दोन महिन्यापासून सतत ढगाळ हवामाना मुळे तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसाने शेतकऱ्यांची खरीप पिके तरली असून रब्बीच्या ही अशा पल्लवीत झाल्या आहे

पण याच दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाल कांदा आणि उन्हाळ कांद्याची महागडी बियाणे खरेदी करून शेतात टाकली होती पण परतीचा सुरु असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची रोपे उध्वस्त झाली असून त्यामुळे कांदा लागवडीला मात्र ब्रेक लागला आहे

लागवड केलेल्या कांदा पिकावर उणी किडा ने प्रचंड आक्रमन केल्याने लागवड केलेले कांदा पीक शेतातच नष्ठ होण्याच्या मार्गांवर आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे लागवडीला आलेली लाल कांदा रोपेही ही खराब झाल्याने कांदा लागवडीला मात्र ब्रेक मिळाला आहे.
अगोदरच लाल कांद्याला मर आणि उणी किडा, हाबू ,हुमणीने विळखा मारला त्यामुळे बाजारात येणार नवीन कांदा उत्पादन घटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे त्यामुळे बाजारात येणाऱ्या नवीन कांदा पिकाचे भविष्य अवघड होण्याची चिन्हे शेतातच दिसू लागली आहे

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

दुसरीकडे उन्हाळ,लाल कांद्याची रोपे उध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात
सापडला आहे. कृषी दुकानांमध्येही
सतराशे रुपये किलो मिळणारे बियाणे दोन हजारांच्या पुढे गेले आहे.त्याचाही तुटवडा दिसून येत आहे.

यामुळे शेतकरी उन्हाळ कांद्याची रोपे कशी तयार या संकटात शेतकरी सापडला आहे, बियाणे उतरत्या जमिनीत आणि शक्य झाल्यास गादीवाफ्यावर टाकावे ज्या ठिकाणाहून पाण्याचा निचरा होईल अशा ठिकाणी
बियाणे टाकावे असे आवाहन कृषी तज्ञ सुधाकर आहेर यांनी केले आहे.

रोपांना आला सोन्याचा भाव

नाशिक जिल्ह्यात उत्तर -पूर्व भागात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असल्याने तसेच आता लागवड केलेले खरिपातील कांदा आता असलेल्या पाण्यावर निघेल अशी परिस्थिती आहे, त्यामुळे अनेक शेतकरी कांदा रोपे विक्री करत आहे, पण एक एकराच्या रोपासाठी शेतकऱ्यांना मात्र ४०ते ५० हजार रुपये मोजावे लागत आहे

प्रतिक्रिया,,,,
भाव उन्हाळ कांद्याला, रोपे महागली लाल कांद्याची अनेक दिवसातून शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांद्यातुन भाव मिळून चार पैसे पदरात पडत आहे, त्यामुळे साहजीकच शेतकरी हि कांदा पिकावर जोर देत आहे, त्यामुळे जरी भाव उन्हाळा कांद्याला मिळत असला तरी मात्र लाल कांद्याची रोपे महागली असून शेतकऱ्यांना रोपांअभावी इतर पिकाकडे वळावे लागत आहे असे आवाहन प्रगतीशील कांदा उत्पादक युवा शेतकरी ज्ञानेश्वर भालेराव यांनी केले


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!