नाशिक जिल्ह्यात ते रात्री येतात, आणि तुमचे…
नाशिक जिल्ह्यात ते रात्री येतातः आणि तुमचे वाहन सहज गायब करतात

वेगवान नाशिक /मारुती जगधने
नाशिक, ता. 11आॅक्टोबर 2024 – तुमच्या घरापुढे वाहन असल्यास सावधान व्हा, कारण ते रात्री गुपचुप येतात, ,सद्या कार, बाईक, ट्रॅक्टर, ट्रक किंवा तुमची महत्वाचे कोणतेही वाहन घरापुढे लावलेले असेल तर तुम्हाला झोपत ठेवून ते तुमच्या घरी येऊन तुमचे वाहनाची चोरी करुन नेतात.
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी कांद्याचा भरलेल्या ट्रॅक्टर घरासमोरून चोरून नेण्यात आला. मात्र एवढ ट्रॅक्टर जाऊन सुध्दा ते शेतक-याच्या लक्षात आले नाही. नाही.
नाशिक जिल्ह्यात अजून अजब प्रकार समोर आला आहे. जरा तुम्ही नाशिक जिल्ह्यातील असाल तर सावधान व्हा, कारण संकट तुमच्या घरावर पण येऊन धडकले.
नांदगाव रेल्वे स्थानक महत्त्वाच्या मालवाहतुकीच्या केंद्रांपैकी एक आहे. येथे सिमेंट रासायनिक खते आणि इतर अवजड माल रेल्वे मार्गाने हलवला जातो. नांदगाव मालधक्क्याच्या माध्यमातून सिमेंटसह विविध प्रकारचे माल जवळच्या औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रात पोहोचवले जातात.
याशिवाय, नांदगाव स्थानक हे भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, ते मनमाड-पूर्णा मार्गावर आहे.
नांदगांव येथे मोठा माल धक्का असल्याने शेकडो बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होतो.
येथे शेकडो मालवाहुट्रक दैनंदिन मालवाहतुकीस नंबरला लावलेल्या आसतात त्यातच दि ९ आॅक्टोबर रोजी राञी १० वा लावलेली मालट्रक राञीतुन चोरांनी पळवून नेली. या घटनेमुळे वाहनधारकामध्ये दहशत निर्माण झाली .
रात्रीच्या सुमारास रेल्वे मालवाहतूक सिमेंटच्या धक्क्यावरून ट्रकची चोरी…झाली घटनेची नांदगांव पोलिसात तक्रार दाखल झाली. नाशिकच्या नांदगाव येथील रेल्वे सिमेंट मालवाहतूक धक्य्यावर नंबरला लावलेली सिमेंट वाहतूक कराणारी मालट्रक रात्रीच्या सुमारास मालवाहतूक ट्रक एम एच 41 जी 5572 कचरू पवार राहणार टाकळी ता. नांदगांव जि.नाशिक यांच्या मालकीची मालवाहतूक ट्रक चोरी गेल्याची घटना नांदगाव मध्ये घडली.
या अगोदर देखील या रेल्वे मालधक्यामधून 3 ट्रक चोरीस गेल्याचे समजते, या घटनेचा व्हिडीओ नांदगांव ४० गांव नॅशनल हायवे वरील जळगाव बुद्रुक या टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या बाबत नांदगाव पोलीस ठाण्यात संशयित विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
