दसऱ्याला नाशिक जिल्ह्यात कुठे होणार विशेष फायर शो
दसऱ्याला नाशिक जिल्ह्यात कुठे होणार विशेष फायर शो
वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला,दि.१० ऑक्टोबर :-राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या येवला शिवसृष्टी मध्ये दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ९ वाजता विशेष फायर शोचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी दिली आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर शिवसृष्टी प्रकल्प पाहण्यासाठी नागरिकांकडून रोज गर्दी करण्यात येत आहे.
येवला शहरात साकारण्यात आलेल्या या शिवसृष्टी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला दसऱ्यानंतर सुरुवात होणार आहे.दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ९ वाजता नागरिकांसाठी विशेष फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वसंत पवार यांनी केले आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये