एवढ्या जिल्ह्यांमध्येे कृषी संजीवनी प्रकल्पाचा शेतक-यांना होणार फायदा
एवढ्या जिल्ह्यांमध्येे कृषी संजीवनी प्रकल्पाचा शेतक-यांना होणार फायदा
मुंबई, ता. 10 आॅक्टोबर 2024 – Funded by the World Bank जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.
या प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव व नाशिक या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित सहा हजार कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी गावांसाठीचे निकष निर्धारित करुन त्यानुसार गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निवड केलेल्या एकूण ६९५९ गावांच्या यादीस मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा दोनसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापन करण्यात आली आहे.
फायदा
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात हवामानास अनुकूल कृषी उपक्रमांचा अवलंब करण्यासाठी परत संपलेली आर्थिक सबसिडी
2) पॉली हाऊस, पॉली बोगदे इत्यादी संरक्षित लागवड तंत्रांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.
3) ठिबक, स्प्रिंकलर्स, शेततळे, शेततळ्यांचे अस्तर इत्यादीसारख्या शेतीच्या जलसंधारणाच्या उपक्रमांसाठीही अनुदान उपलब्ध आहे.
4) हवामान प्रतिरोधक बियाणे उत्पादन देखील समाविष्ट आहे
5) शेतकरी उत्पादक संस्था/कंपन्या आणि बचत गटांसाठी विशेष सहाय्य
6) आधार सक्षम पेमेंट प्रणालीद्वारे वितरण
7) महिला, अपंग व्यक्ती आणि भूमिहीन मजुरांना दिलेला विशेषाधिकार