आता प्रत्येक गावातील या व्यक्तीला 10 हजाराचे मानधन मिळणार, मंत्रीमंडळात निर्णय
आता प्रत्येक गावातील या व्यक्तीला 10 हजाराचे मानधन मिळणार, मंत्रीमंडळात निर्णय
वेगवान नाशिक
मुंबई, ता. 10 आॅक्टोबर 2024 – राज्य सरकारने मंत्रिमंडळामध्ये विविध निर्णयांचा सपाटा लावला आहे एका मागून एक आणि एक मोठ मोठे निर्णय मंत्रिमंडळात घेतले जात आहे यामुळे महाराष्ट्राच्या पदरामध्ये खूप काही पडत आहे.
आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वाचा निर्णय गाव स्तरावरती घेण्यात आलेला आहे. हा निर्णय एक दृष्टीने खूपच चांगला झालेला आहे. अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत मधील आपले सरकार चालवणाऱ्या केंद्र चालकांना आता सरकारमार्फत मोठं मानधन देण्याची घोषणा झाली आहे.
आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत) प्रकल्पासाठी केंद्रचालकांना ग्रामरोजगार सेवकांच्या धर्तीवर दरमहा दहा हजार रुपये मानधन ग्रामपंचायीतमार्फत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पामुळे पंचायत राज संस्थांचा कारभार संगणीकृत होऊन ई- पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसुत्रता आणि पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे.