नाशिकः रस्त्यावर पडला अचानक 20 फुटचा खड्डा, तुम्ही कसं वाहन चालविणार
नाशिकः रस्त्यावर पडला अचानक 20 फुटचा खड्डा, तुम्ही कसं वाहन चालविणार
वेगवान नाशिक / अरुण थोरे
निफाड, ता. नाशिक जिल्ह्यातील गावा खेड्यातून जर तुम्ही प्रवास करत असाल ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही जात असलेल्या रस्त्याला कधीही मोठा खड्डा किंवा भगदाड पडू शकते.
त्यामुळे प्रवास करताना सावधानता बाळगावी, अशीच घटना आहे.नाशिक जिल्ह्यातील एका गावात घडली आहे.या गावात एक आश्चर्यकारक घटना घडली असुन, सिमेंट कॉन्क्रेंट असलेल्या रस्ताला अचानक विस फुटाचा खड्डा पडला आहे.
म्हणुन सदर गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर रस्त्यावर असे खड्डे पडू लागले तर प्रवाशाचे काय होणार.
याबाबत ची अधिक माहिती अशी, निफाड तालुक्यातील कानळद येथील काँक्रेट रस्त्याला अचानक वीस फूट खोलीचा खड्डा पडला आहे. साधारणता साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास एक ट्रॅक्टर चालक सदर रस्त्यावरून ट्रॅक्टर घेऊन जात असताना ट्रॅक्टर पुढे गेल्यावर सदर रस्त्याला अचानक भगदाड पडले.
मात्र कोणतीही जीवित हानी अथवा नुकसान झाले नसल्याने ट्रॅक्टर चालकावरील मोठी बाला तळली आहे. मात्र सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला झालेल्या भगदाडांमुळे गावात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.