नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस, ढगांचा गडगडाट , विजांचा कडकडाट

मुक्ताराम बागुल / वेगवान नाशिक
नांदगाव, ता. 10 आॅक्टोबर 2024-
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाली होते. Heavy rain, thunder and lightning in Nashik district
दररोज दिवसभर ढगाळ वातावरण व्हायचे मात्र पाऊस पडत नव्हता. दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवारी मात्र रात्री नऊ वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. मात्र उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने बसविलेल्या ठिकाणी रोज दांडिया खेळणाऱ्या तरुण-तरुणींना मात्र दांडिया खेळण्याचा आनंद आनंद घेता आला नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला.
नाशिक शहरात आज पावसाने चांगलेच धुवन काढले. नाशिक शहरासह नांदगाव, चांदवड, दिंडोरी, आदीहून तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मका पिक कापणीला आले असून शेतक-यांची सोयाबीन या पावसात भिजल्याने मोठं नुकसान झालयं
