एक वर्षात करोडपती करणारे शेतीमधील हे पिक माहित आहे का millionaires
Do you know this crop in agriculture that makes millionaires in one year?
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. 9 आॅक्टोबर 2024 – रात्रंदिवस शेतीमध्ये काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक दिवस मात्र येत असतो, शेतकरी विविध प्रकारचे पिके शेतीमधून घेतोत. कधी नफा तर कधी तोटा असं शेतकऱ्याचं गणित आयुष्यभर सुरू असतं. मात्र जसजसं दिवस पुढे चालले तसतशी शेती आधुनिक पद्धतीने व्हायला सुरुवात झालेली आहे.Do you know this crop in agriculture that makes millionaires in one year?
ज्या शेतकऱ्यांना अक्षरशा कवडीमोल भावामध्ये आपला माल विकावा लागत होता. आता तोच माल शेतकऱ्यांसाठी अक्षरशा सोन्यासारखा भाव देत आहे. आज जर तुम्ही कांद्याची परिस्थिती पाहायला गेली तर कांदा चार हजाराच्या पुढे असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय.
त्याचबरोबर टोमॅटो ही अक्षरशा एक हजार रुपये कॅरेट च्या पुढे गेलेला आहे. एवढेच नाही तर आम्ही तुम्हाला अशा पिकाची माहिती सांगणार आहे की जो पीक तुम्हाला एका वर्षामध्ये करोडपती बनवणार आहे .आणि हे सत्य आहे कारण तुम्ही जर या पिकाचा भाव बघितला तर अक्षरशः हैराण व्हाॅल.
महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये सध्या डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं मात्र अनेक शेतकऱ्यांना डाळिंबाने खड्ड्यात घातल्यामुळे शेतकरी डाळिंब पिकाला वैतागलेत.
अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात तोडून टाकल्यात. एवढाच नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात डाळिंब उत्पादन घेतल्या जात होतं, पुणे जिल्ह्यामध्ये ही डाळिंब घेतल्या जात आहे. याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये डाळिंबाचा आता उत्पादन घेतल्या जात आहे.
शेतकरी या पिकाकडे वळतोय मात्र तुम्ही जर डाळिंब पिकाचा भाव जर आता बघितला तर अक्षरशा तुम्हाला खरोखर वाटेल की एका रात्रीमध्ये किंवा एका वर्षात शेतकरी करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही.
गोड, रसाळ आणि लाल बिया असलेले डाळिंब हे एक फळ आहे जे वर्षभर उपलब्ध असते. बिया म्हणून खाणे असो वा रस म्हणून खाणे असो, हे फळ सध्या ग्राहकांना भुरळ घालत आहे. अतिवृष्टी आणि पाणीटंचाईमुळे फळांचा दर्जा घसरला असून, परराज्यातील खरेदीदार स्थानिक स्त्रोतांकडून डाळिंब खरेदी करत असल्याने बाजारपेठेतील पुरवठा कमी झाला आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवामुळे डाळिंबाच्या मागणीत वाढ झाली असून, उच्च दर्जाच्या डाळिंबाच्या किमती ₹५०० प्रति किलोग्रॅमपर्यंत वाढल्या आहेत.
पुण्याच्या गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजारपेठेत बारामती, माळशिरस, नाटेपुते आणि इंदापूर या भागातून डाळिंब येतात. बाजारात दररोज सरासरी 60 ते 70 टन डाळिंबाची आवक होत आहे. भविष्यातील अपेक्षांच्या तुलनेत सध्याचा पुरवठा स्थिर आहे. मात्र, काही भागात पाणी साचल्याने आणि अतिवृष्टीमुळे डाळिंबाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. इतर राज्यातील खरेदीदारांनी थेट स्थानिक स्त्रोतांकडून दर्जेदार डाळिंब खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे बाजारपेठेतील पुरवठा कमी झाला आहे. आवक असलेला केवळ वीस टक्के साठा चांगल्या दर्जाचा आहे; उर्वरित कमी रसाळ आणि आकाराने लहान आहे. सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवामुळे डाळिंबाची मागणी जास्त आहे, परिणामी भावात लक्षणीय वाढ झाल्याचे डाळिंब व्यापारी युवराज काची यांनी नमूद केले.
डाळिंबाच्या जाती : केसर, अर्कटा, गणेश
आवक: 60 ते 70 टन
घाऊक किंमत: ₹20 ते ₹350 प्रति किलोग्रॅम
किरकोळ किंमत: ₹180 ते ₹500 प्रति किलोग्रॅम