शेती

सावधानः नाशिक सह महाराष्ट्रात एवढ्या दिवस पाऊस कोसळणार, पंजाराव डख यांचा इशारा Heavy rain

सावधानः नाशिक सह महाराष्ट्रात एवढ्या दिवस पाऊस कोसळणार, पंजाराव डख यांचा इशारा


वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे 

नाशिक, ता. 9 आॅक्टोबर 2024- Heavy rain   महाराष्ट्र मध्ये पावसाने आजपासून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली आहे. हवामान विभागाबरोबर पंजाबराव ढग यांचा नवीन अंदाज आलेला आहे. या अंदाजानुसार शेतकऱ्यांची मका, सोयाबीन पीक भिजू शकतो आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे. Caution: Panjarao Dakh warns that it will rain in Nashik and Maharashtra for so long

 

त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा इशारा आता पंजाबराव डख यांनी दिलेला आहे. कारण आज पासून पाऊस कोसळणार आहे. तब्बल आठ दिवस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज हवामान अंदाजानुसार पाऊस पडलेला आहे. पुणे विभागाच्या हवामान अंदाजानुसार आज नाशिक जिल्ह्यातले अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेंचा कडकडाटासह आज पाऊस कोसळला, मात्र येथून पुढे पावसाचा जोर अजून वाढणार असल्याचं माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मका आणि सोयाबीन हे पीक काढणीला आलेला आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन आणि मका काढून त्यामध्ये कांदा लागवड करायची आहे. तर परत पुन्हा काही शेतकऱ्यांना मका लागवड करायची आहे. मात्र मका आणि सोयाबीन पीक जर कापणी झाली आणि ते जर पावसात भिजलं तर संपूर्ण शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे.

निसर्गाचा काही नियम नसतो पाऊस किती आणि कसा पडतो हे काय कोणी लिहून ठेवलेलं नाही, मात्र जोरदार पद्धतीने पाऊस तांडव करणार आहे, असाही अंदाज हवामान विभाग आणि पंजाबराव यांनी व्यक्त केलेला आहे.

पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, म्हणजे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्र, आणि कोकण या भागात रोज भाग बदलत विजेच्या कडकडाट्स जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे .ती वर्तवण्यात आलेली आहे. 12 ऑक्टोबर पासून विदर्भात आणि पावसाला सुरुवात होणार असल्याचं पंजाबराव म्हणाले .

12 ते 16 ऑक्टोबर या काळात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर बीड, जालना या जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे.  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर नगर, नाशिक,नंदुरबार, धुळे ,जळगाव या जिल्ह्यातील पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता मका आणि सोयाबीन पीक भिजणार याची चिंता लागून राहिलेली असली तरी पुढे येणाऱ्या हरभरा आणि गहू या पिकासाठी हा होणारा पाऊस वरदान दायक असल्याचं माहिती समोर येत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला याचा सोयाबीन उडीद आणि इतर भाजीपाला आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!