नाशिक जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळला, शेती पिकाची वाट
नाशिक जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळला, शेती पिकाची वाट Return of rain in Nashik district, waiting for agricultural crop

वेगवान नाशिक / मुक्ताराम बागुल
नाशिक, ता. महाराष्ट्र मधून मान्सून परतीला निघालेले आहे मात्र या परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्याला जोडपला आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं. Return of rain in Nashik district, waiting for agricultural crop
नाशिक जिल्ह्यात पाऊस पडला असला तरी अनेक तालुक्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा अजून कामे कायम आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये समाधानकारक असा पाऊस पडला नाही. राज्याच्या आकडेवारीनुसार 100% च्या पुढे पाऊस गेला, मात्र नाशिक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही.
पूर पाण्यामुळे नाशिक जिल्ह्यातले काही धरण भरण्यात आली, मात्र वरुन राजाने संपूर्ण जिल्ह्याला योग्य न्याय या वर्षी पण दिला नाही. सर्वत्र पाऊस न झाल्यामुळे जमिनीची पातळी मात्र उंचवली नाही. जर येथून पुढे पाऊस न झाल्यास नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण ही बातमी तुम्हाला वेगवान नाशिकवर वाचण्याची वेळ येऊ नये.
नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या परिसरामध्ये रिमझिम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली.
या रिमझिम पावसामुळे बोलठाण, रोहिले बुद्रुक, गोंडेगाव, जवळकी, जातेगाव, गावात व परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या मका पिकाचे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यां मध्ये चर्चा सुरू आहे.
नांदगाव तालुक्यात बहुतेक ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला असल्याची चित्र आहे परंतु परिसरामध्ये म्हणावा तसा पाऊस झाला नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जास्त प्रमाणात भासेल असे शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे.
सध्या मका कापनी काम सुरू आहे. मका कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने व त्यातच हा पाऊस झाल्याने मजूर पावसामुळे काम सोडून घरी गेल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहन करावी लागत आहे.
