लाडक्या बहिणीच्या खात्यावर पुन्हा पैशाचा पाऊस, थेट 7500 आले
लाडक्या बहिण्याच्या खात्यावर पुन्हा पैशाचा पाऊस, थेट 7500 आले
वेगवान नाशिक
मुंबई, ता. 8 आॅक्टोबर 2024 – महाराष्ट्र मध्ये महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपल्या बँकेचा खातं चेक करण्यास भाग पाडलेलं आहे .कारण आता महाराष्ट्रात कधी कोणाचे पैसे य येऊन पडतील त्याचा नियम नाही. लाडक्या बहिणीबाबत पुन्हा असाच झालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुतीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला दिवाळीचे भेट म्हणून तीन हजार रुपये आगाऊ पाठवणार आहे.
त्यानुसार हे तीन हजार रुपये आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत ज्या महिन्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये 7500 रुपये जमा झाले आहे.
ज्या महिलांना हे पैसे आले नसतील त्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3000 जमा झाले आहे. येत्या दोन तीन दिवसांत लाडक्या हे पैसे जमा होणार आहे.
लाडक्या बहिणीचे आगामी पुढील महिन्याचे पैसे अगोदरच महिलांच्या खात्यात जमा झाल्यामुळे महायुतीने आपल्या मताची वोट बँक पक्की केल्याची ची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. एवढे पैसे एका महिलेला मिळत असल्यामुळे एवढं मतदानाचे पैसे वाटणे शक्य नाही. ते महायुतीच्या लाडक्या बहिणीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप, राष्ट्रवादी, आणि शिवसेना म्हणजे महायुती निश्चितपणे विजयाकडे वाटचाल करीत असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला होता. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 4500 तर काही महिलांच्या 1500 रूपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता लगेचच महिलांना चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचा लाभ मिळालाआहे. म्हणजेच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
जर तुमच्या खात्यात पुन्हा 3000 रुपये पडले नसतील किंवा ज्या महिलांना 1 रुपया पण मिळाला नाही त्यांच्या खात्यावर थेट 7500 रुपये जमा होणार आहे. तर ज्यांना 4500 जमा झाले असतील त्यांना एवढ्या एक दोन दिवसात पुन्हा 3000 हजार रुपये येणार आहे.