या गावातील महिला सारख्या दिवस भर फिरतात आणि..

वेगवान नाशिक/सागर मोर
वणी:आदिमायेच्या नवरात्रोत्सवात अहिवंतवाडी गृप ग्रामपंचायतीने महिलांचा ऊध्दवस्त होऊ पाहणाऱ्या संसाराला महिलांच्या पुढाकारातून दारू बंदीचा ठराव करत अविस्मरणीय भेट दिलीआहे.गृ
प ग्रामपंचायत ने अहिवंतवाडी गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला असुन या गावातील महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात कंबर कसली होती, अहिवंत वाडी गावात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री राजरोस सुरू होती दारु पिणा-यांचे संख्या दिवसागणिक वाढ होत चालली होती, याचा विपरित परिणाम लहान मुलांवर होऊ लागल्याने गावातील जवळपास दोनशे पेक्षा जास्त महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला.
तसा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला.या महिलांनी पुढाकार घेतल्याने दारूबंदी करण्यात आली आहे.रोजच्या रोज ह्या महिला गावात फिरतात असा प्रकार दिसल्यास आक्रमक होतात.त्यामुळे आता तरी गावात विक्री होत नाही या महिलांनी या बाबत वणी पोलीस ठाण्यात निवेदन दिले तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला ही निवेदन दिले आहे.
वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.सुनिल पाटील यांनी या महिलांचे अभिनंदन करत गावात या बाबत गस्त वाढवुन हे प्रकार बंद केले तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चकरा वाढविल्या आहे.या महिलांना ग्रृप ग्रामपंचायतीत असलेल्या अनेक पाड्यावर ही बंदी केली असुन विक्री करणारा सापडल्यास पोलिसांत देतात तसेच विक्री संदर्भात गुप्त माहिती देणाऱ्यास या महिला बक्षीस देतात त्यामुळेच जवळपास शंभर टक्के दारू बंदी होईल असा विश्वास यावेळी अहिवंत वाडी दारू बंदी अध्यक्षा सविता शार्दुल यांनी व्यक्त
केला या वेळी अलका शार्दुल योगीता राठोड शांताबाई शार्दुल लक्ष्मीबाई शार्दुल मंजुळा कराटे सुरेखा शेखरे उज्ज्वला कर्डक सिंदुबाई शिंदे.यांनी पुढाकार घेतला होता
