मुलगा विहीरत पडल्याने आई गेली वाचविण्यासाठी मात्र..
आई आणि मुलगा पडला विहीरत, नाशिक जिल्ह्यातील घटना

वेगवान नाशिक
नाशिक, ता. 8 सप्टेंबर 2024 – विहिरीत पडलेल्या आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका मातेला आपला जीव गमवावा लागला. आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या वृत्ताने परिसरात शोककळा पसरली आहे.
सोमवारी (ता. 7) सकाळी 9 वा. गांगुर्डे वस्ती (दिघवड) येथे शिवांश दौलत गांगुर्डे नावाचा दोन वर्षांचा मुलगा खेळत असताना विहिरीत पडला. त्याची आई पूजा (27) यांनी त्याला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. खूप प्रयत्न करूनही त्यांना वाचविता आले नाही. त्या मातेच्या हाताला शारीरिक अपंगत्व आल्याने ती त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होती आणि तीही विहिरीत पडली.
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने आई आणि मुलगा दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र पाण्याची पातळी जास्त असल्याने पूजा आणि शिवांश यांना शोधणे कठीण झाले होते.
सुमारे तीन ते चार तासांनंतर पूजाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर विहिरीतील पाणी आटले, मात्र सायंकाळपर्यंत शिवांशचा मृतदेह सापडला नव्हता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक भानुदास नर्हे उपस्थित होते. पूजाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे चांदवड तालुक्यातील दिघवद व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
